Joe Root : इंग्लंडचा जो रुट सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडणार का?

Joe Root : जो रुटने श्रीलंकेविरुद्ध दोन्ही डावांत शतक ठोकलं आहे.

158
Joe Root : इंग्लंडचा जो रुट सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडणार का?
  • ऋजुता लुकतुके

जो रुट (Joe Root) बेलाशक इंग्लंडचा या घडीचा सर्वोत्तम फलंदाज आहे. श्रीलंकेविरुद्ध दोन्ही डावांत शतकं आणि त्यातही आपलं ३४ वं शतक पूर्ण करून त्याने आपलं सातत्य दाखवून दिलं आहे. त्याचबरोबर क्रिकेट पंडितांसमोर प्रश्न उभा केला आहे की, जो रुटच सचिनचा सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम मोडणार का? किंबहुना हा विक्रम तो कधी मोडू शकेल? कारण, १५,००० कसोटी धावांसाठी रुटला आता फक्त ३.५५४ धावा हव्या आहेत. रुट सध्या ३३ वर्षांचा आहे.

श्रीलंके विरुद्धच्या मालिकेत ३४ वं शतक ठोकून तो इंग्लंडचा सर्वाधिक यशस्वी फलंदाज बनला आहे. त्याने या कसोटीत नावावर केलेले इतर विक्रमही पाहूया. म्हणजे सचिनची त्याची तुलना का होतेय हे लक्षात येईल.

(हेही वाचा – Anandacha Sidha : उत्सव तोंडावर पण… शिध्याचा ‘आनंद’ फक्त रव्यापुरताच)

  • जो रुटने इंग्लंडच्या ॲलिस्टर कूकचा ३३ शतकांचा विक्रम मागे टाकला आहे. त्याचबरोबर तो आता शतकांच्या बाबतीत फक्त सचिन तेंडुलकर, जॅक कॅलिस, रिकी पाँटिंग, कुमार संगकारा आणि राहुल द्रविड यांच्या मागे आहे.
  • लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर एकाच कसोटीत दोन शतकं करणारा तो जॉर्ज हॅडली, ग्रॅहम गूच आणि मायकेल वॉन नंतरचा फक्त चौथा फलंदाज आहे.
  • लॉर्ड मैदानावर रुटने एकूण २०२२ धावा केल्या आहेत. या मैदानावर एका खेळाडूने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. ग्रॅहम गूचचा २०१५ धावांचा विक्रम त्याने मागे टाकला आहे. त्याचबरोबर एकाच मैदानावर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो पाचवा आहे.
  • जो रुटने (Joe Root) इंग्लंडमध्ये म्हणजे घरच्या मैदानावर एकूण ६,७३३ धावा केल्या आहेत. आणि इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता त्याच्या नावावर जमा झाला आहे. यापूर्वी ॲलिस्टर कूकने ६,५६८ धावा केल्या होत्या.
  • लॉर्ड्सवरील शतक हे त्याचं ५० वं आंतरराष्ट्रीय शतक होतं. अशी कामगिरी करणारा तो फक्त पहिला इंग्लिश खेळाडू आहे. ३४ कसोटी आणि १६ एकदिवसीय शतकं त्याच्या नावावर आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० आंतरराष्ट्रीय शतकांची कामगिरी बजावणारा तो नववा क्रिकेटपटू आहे.

(हेही वाचा – Mumbai Local Train : दर रविवारी मेगाब्लॉक घेवूनही सलग दुसऱ्या आठवड्यात हार्बर लाईन ठप्प)

  • त्याच्या नावावर २०० कसोटी झेलही जमा आहेत. लॉर्ड्स कसोटीत त्याने दोन झेल टिपले तेव्हा तो यष्टीरक्षका व्यतिरिक्त सर्वाधिक झेल टिपणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्या पुढे राहुल द्रविड आणि जॅक कॅलिस आहेत.
  • लॉर्ड्स कसोटीत दुसऱ्या डावात त्याने १११ चेंडूंत शतक पूर्ण केलं. हे त्याचं सर्वात वेगवान शतक आहे. यापूर्वी ११६ चेंडूंत त्याने शतक झळकावलं होतं.
  • सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो रुटने (Joe Root) आता कसोटी क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये आता जो रुटच्या नावावर १२,३७७ धावा जमा झाल्या आहेत. सर्वाधिक धावांच्या यादीत तो सातव्या क्रमांकावर आहे. सर्वोत्तम फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत १५,९२१ धावा. म्हणजेच सचिनपेक्षा जो रुट फक्त ३,५४४ धावांनी मागे आहे. ३३ व्या वर्षी त्याच्यातील क्रिकेटही अजून बरंच बाकी आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकरला मागे टाकण्याची वाटचाल तो नक्कीच करू शकतो. या यादीत पुढचा सध्या खेळत असलेला खेळाडू आहे तो विराट कोहली. तो १९ व्या क्रमांकावर आहे. त्याच्या ८,८४८ धावा झाल्या आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.