- ऋजुता लुकतुके
महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली ही आधुनिक क्रिकेटमधील भारताची दोन महत्त्वाची नावं आहे. आपली फलंदाजी, मैदानावरील वावर आणि कप्तानीतही दोघांनी २०१० च्या दशकात आपला ठसा उमटवला आहे. दोघांनी भारतीय संघाला जिंकायला शिकवलं. त्यासाठी मैदानावर जीव तोडून खेळण्याची शिकवण दिली. विराट कोहली अलीकडेच टी-२० क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटचा तो अविभाज्य भाग आहे. तर धोनी आयपीएलमध्ये सक्रिय आहे. चेन्नई सुपरकिंग्जसाठी तो कधी खेळाडू तर कधी निव्वळ मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहे.
धोनी आणि विराट एकाच वेळी भारतीय संधासाठी खेळले आहेत. धोनी हाच विराटचा पहिला कर्णधार आहे. २००८ मध्ये विराट भारतीय संधात आला तेव्हा धोनीच कर्णधार होता. पुढील दहा वर्ष या स्थानावर तो कायम राहिला. विराटने धोनीकडून नेतृत्व हाती घेतलं. अशावेळी दोघांचं ड्रेसिंग रुममधील नातं नेमकं कसं होतं असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यांना एकत्र पाहिलेले खेळाडू सांगतात की, दोघांचं एकमेकांशी नातं नितांत आदराचं आहे. (Dhoni-Virat Relationship)
(हेही वाचा – Jammu and Kashmir: लष्करी ठाण्यावर लपून गोळीबार! १ जवान हुतात्मा, शोधमोहीम सुरू)
क्रिकेटच्या बाहेर मुलाखतींमध्ये एकमेकांबद्दलचा हा आदर या खेळाडूंनी व्यक्तही केला आहे. त्याचवेळी महेंद्रसिंग धोनीचा विराट विषयी बोलतानाचा एक व्हिडिओ अलीकडेच व्हायरल झाला आहे. यात धोनी म्हणतो, ‘मला माहीत नाही, मी स्वत:ला त्याचा मोठा भाऊ म्हणू शकतो का? आम्ही २००८ पासून एकत्र खेळतोय. तुम्ही या नात्याला काहीही नाव द्या. पण, आमच्यासाठी महत्त्वाचं हे आहे की, आम्ही खूप वर्षं एकत्र खेळलोय. त्यामुळे शेवटी आम्ही एकमेकांचे साथीदार आहोत आणि जागतिक क्रिकेटमध्ये विराट सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे, हे तर कुणीही नाकारू शकणार नाही.’
Dhoni and ViratKohli relationship ❤️
– The Mahirat duo! 💥
Dhoni #ViratKohli
#ThalaDharisanam #IPLonJioCinema TATAIPL#Rohitsharma #Msd pic.twitter.com/Ov0iVvyYh2— SubashMV (@SubashMV5) August 31, 2024
(हेही वाचा – Congress मध्ये संधी देण्यासाठी केले जाते लैंगिक शोषण; काँग्रेसच्या महिला नेत्याने केलेल्या गंभीर आरोपामुळे राजकरणात खळबळ)
खेळाडू म्हणून धोनीने विराटचं अनेकदा जाहीर कौतुक केलं आहे. पण, कर्णधान म्हणून दोघांनी एकमेकांना दिलेली साथही महत्त्वाची आहे. कारण, २०१४ मध्ये धोनीकडून कसोटी कर्णधारपद विराटकडे आलं. तर २०१७ मध्ये विराट एकदिवसीय क्रिकेटमध्येही कर्णधार झाला. महेंद्रसिंग धोनीने भारतीय संघाला जिंकायला शिकवलं. टी-२०, एकदिवसीय असे दोन्ही विश्वचषक आणि चॅम्पियन्स करंडक भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला.
तर विराटने नेतृत्वाची धुरा पुढे नेताना, भारताबाहेर जिंकण्याची सवय भारतीय संघाला लावली. विराटची कसोटी यशाची टक्केवारी ८० टक्के इतकी मजबूत आहे. नेतृत्वाची हे स्थित्यंतर विराट आणि धोनीचे संबंध चांगले नसते तर इतकं हळूवार झालंच नसतं असं नेहमी बोललं जातं. विराटने कर्णधार म्हणून धोनीच्या नेतृत्व गुणांचा सदैव आदर केला आहे. तर धोनीने सर्वोत्तम फलंदाज म्हणून विराटला नेहमीच मान दिला आहे. (Dhoni-Virat Relationship)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community