T20 Cricket Record : निकोलस पूरनने एकाच खेळीत ख्रिस गेलचे महत्त्वाचे सगळे विक्रम मोडले

T20 Cricket Record : एका वर्षांत सर्वाधिक षटकारांबरोबरच इतर अनेक टी२० विक्रम आज मोडीत निघाले.

152
T20 Cricket Record : निकोलस पूरनने एकाच खेळीत ख्रिस गेलचे महत्त्वाचे सगळे विक्रम मोडले
  • ऋजुता लुकतुके

वेस्ट इंडिजचा घणाघाती फलंदाज निकोलस पूरन सध्या सुरू असलेली कॅरेबियन टी-२० लीगही गाजवत आहे. रविवारच्या एकाच खेळीत त्याने ख्रिस गेलचे अनेक विक्रम मोडित काढले आहेत. त्रिनिदाद अँड टोबॅगो नाईटरायटर्स संघाकडून खेळताना त्याने घणाघाती फलंदाजीचा अविष्कार या हंगामात दाखवून दिला आहे. सेंट किट्स संघाविरुद्ध त्याने ४३ चेंडूंत ९७ धावा केल्या. या खेळीत ९ षटकार लगावले. आपल्या संघाला त्याने ४४ धावांनी विजयही मिळवून दिला. (T20 Cricket Record)

(हेही वाचा – Congress मध्ये संधी देण्यासाठी केले जाते लैंगिक शोषण; काँग्रेसच्या महिला नेत्याने केलेल्या गंभीर आरोपामुळे राजकरणात खळबळ )

या खेळीदरम्यान पूरनने हंगामातील सर्वाधिक षटकारांचा ख्रिस गेलचा विक्रम मोडला आहे. २०२४ मध्ये पूरनने १३९ षटकार खेचले आहेत. ख्रिस गेलने २०१५ मध्ये एकूण १३५ षटकार ठोकले होते. सर्वाधिक षटकारांच्या बाबतीत ख्रिस गेलच दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने २०११ मध्ये ११६ तर २०१२ मध्ये १२१ षटकार खेचले होते. फक्त इतकंच नाही तर निकोलस पूरनने या हंगामात टी-२० मध्ये एकूण १,८४४ धावाही केल्या आहेत. त्या बाबतीत म्हणजे हंगामात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. ॲलेक्स हेल्सने १,९४६ आणि महम्मद रिझवानने २,०३६ धावा केल्या आहेत.

(हेही वाचा – Joe Root : इंग्लंडचा जो रुट सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडणार का?)

निकोलस पूरन आयपीएलमध्ये यंदा लखनौ सुपरजायंट्स संघाकडून खेळला. पण, कॅरेबियन लीगमध्ये तो कोलकाता नाईटरायडर्सच्याच मालकीची फ्रँचाईजी त्रिनिदाद अँड टोबॅगोसाठी खेळतो. त्याच्या अप्रतिम खेळीमुळेच रविवारच्या सामन्यात त्रिनिदाद संघाने ४ बाद २५० धावा केल्या. त्याला उत्तर देताना सेंट किट्स संघ निर्धारित २० षटकांत ८ बाद २०४ धावाच करू शकला. निकोलस पूरन घणाघाती फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. टी-२० प्रकारात एक ताकदीचा फलंदाज म्हणून ओळखला जातो. (T20 Cricket Record)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.