Ganeshotsav 2024 : मुंबई महापालिकेच्या ‘श्री गणेशोत्सव माहिती पुस्तिका – २०२४’चे प्रकाशन

107
Ganeshotsav 2024 : मुंबई महापालिकेच्या ‘श्री गणेशोत्सव माहिती पुस्तिका - २०२४’चे प्रकाशन
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या व बृहन्मुंबई महानगरपालिका मुद्रणालयाद्वारे मुद्रित करण्यात आलेल्या ‘श्री गणेशोत्सव माहिती पुस्तिका – २०२४’चे प्रकाशन अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते सोमवारी २ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात आले. मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आयोजित या कार्यक्रमाला उप आयुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे, उप आयुक्त (शिक्षण) चंदा जाधव, उप आयुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) (अतिरिक्त कार्यभार) शरद उघडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी आदी उपस्थित होते. (Ganeshotsav 2024)

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आणि गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पूरक माहिती देणारी पुस्तिका मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जनसंपर्क विभागाद्वारे दरवर्षी प्रकाशित करण्यात येते. त्यानुसार यंदा देखील या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले आहे. (Ganeshotsav 2024)

(हेही वाचा – BMC : डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे), जोशींकडून काढला परवाना विभागाचा भार…)

‌अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उपायुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनानुसार मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तिकेत गणेशोत्सवाशी संबंधित विविध बाबींची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्वसाधारण माहिती, श्री गणेश गौरव स्पर्धेच्या अर्जाचा नमुना, विविध मार्गदर्शक सूचना, कृत्रिम तलावांची यादी, धोकादायक पुलांची यादी तसेच महानगरपालिकेचे व इतर महत्त्वाच्या नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक, विभागीय नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक, नैसर्गिक विसर्जन स्थळांचा विभागवार नकाशा, मूर्ती विसर्जन दिवशी समुद्राला असलेल्या भरती व ओहोटीच्या वेळा, लाटांची उंची इत्यादी माहितीचा समावेश आहे. (Ganeshotsav 2024)

या पुस्तिकेच्या मुखपृष्ठावर असलेला ‘क्यूआर कोड’ स्कॅन करून ही पुस्तिका पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करता येणार आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर देखील ही पुस्तिका उपलब्ध करुन देण्यात आली आहे. (Ganeshotsav 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.