Rajkot Fort : पुतळा दुर्घटनेनंतर सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली

166
Rajkot Fort : पुतळा दुर्घटनेनंतर सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली

मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावरील (Rajkot Fort) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना राज्य सरकारने सोमवारी (२ सप्टेंबर) सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची तडकाफडकी बदली केली. तावडे यांच्या जागी हाफकिन बायो फार्मा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

(हेही वाचा – राज्यात दंगली घडवण्याचे उबाठाचे कारस्थान; Narayan Rane यांचे टिकास्त्र)

सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. या आदेशात किशोर तावडे यांचा समावेश आहे. तावडे यांची बदली महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून झाली आहे. तर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या एस. जी. कोलते यांची नियुक्ती भंडारा जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. (Rajkot Fort)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.