ST Employee Strike: ऐन गणेशोत्सव काळात एसटी कर्मचाऱ्यांचे पुन्हा आंदोलन, आता काय आहे मागणी?

127
ST Employee Strike: ऐन गणेशोत्सव काळात एसटी कर्मचाऱ्यांचे पुन्हा आंदोलन, आता काय आहे मागणी?
ST Employee Strike: ऐन गणेशोत्सव काळात एसटी कर्मचाऱ्यांचे पुन्हा आंदोलन, आता काय आहे मागणी?

एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या आर्थिक मागण्या आणि राज्य सरकारकडून सुरू असलेले वेळकाढूपणाचे धोरण यामुळे एसटी (ST Employee Strike) कामगार संयुक्त कृती समितीने आज, मंगळवारपासून राज्यातील सर्व आगार आणि स्थानकांमध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. गणेशोत्सवाच्या (Ganesh Utsav 2024) तोंडावर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ अर्थात एसटी (ST Employee Strike) कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिल्याने चाकरमान्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.

गणेशभक्तांची गैरसोय झाल्यास त्याची जबाबदारी राज्य सरकारची- एसटी कामगार
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कामगारांना वेतन आणि महागाई भत्ता, घरभाडे भत्ता मिळावा, एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट पाच हजार रुपये वेतनवाढ मिळावी या आणि अन्य आर्थिक मागण्या एसटी कामगार कृती समितीने केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कृती समितीची बैठक ७ ऑगस्ट रोजी झाली. २० ऑगस्टला अंतिम बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन या बैठकीत देण्यात आले. मात्र अद्याप तोडगा निघालेला नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र असल्याने ३ सप्टेंबरपासून होणाऱ्या आंदोलनात गणेशभक्तांची गैरसोय झाल्यास त्याची जबाबदारी राज्य सरकारची असणार आहे, असे एसटी कामगार संयुक्त कृती समितीतील पदाधिकाऱ्यांनी सांगितले. (ST Employee Strike)

चाकरमान्यांना आंदोलनामुळे कोणताही त्रास होणार नाही- एसटी प्रशासन
गणपतीच्या काळात कोकणात जाण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे या काळात कोकणात विशेष एसटी बसेस सोडल्या जातात. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे त्यावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच कर्मचाऱ्यांना आंदोलनामध्ये भाग न घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे आता किती एसटी कर्मचारी आणि कोणत्या संघटना या आंदोलनात सहभागी होणार? हे पाहावे लागेल. (ST Employee Strike)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.