BoycottNetflix का होतंय ट्रेंड? ‘Netflix’ला केंद्र सरकारची नोटीस! काय आहे कारण?

186
Netflix विरोधात निर्मात्याची आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार, अधिकाऱ्याची ६ तास चौकशी

केंद्र सरकारने (Central Government) ‘नेटफ्लिक्स’च्या (Netflix) आशय प्रमुखांना समन्स बजावले असून कोणालाही देशाच्या भावनेशी खेळण्याचा अधिकार नाही, असे बजावले आहे. ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या ‘आयसी-८१४ : द कंदहार हायजॅक’ (‘IC-814: The Kandahar Hijack’) या वेबमालिकेतील अपहरणकर्त्यांच्या चित्रणामुळे वाद निर्माण झाला आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाने ‘नेटफ्लिक्स इंडिया’च्या (Netflix) आशय प्रमुखांना सोमवारी समन्स बजावले.

वादग्रस्त भागाबद्दल स्पष्टीकरण द्यावे
‘आयसी-८१४ : द कंदाहार हायजॅक’ या वेबमालिकेत १९९९ साली पाकिस्तानस्थित हरकत-उल-मुदाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचे केलेल्या अपहरणाचे चित्रण आहे. त्यातील कथितरित्या वादग्रस्त भागाबद्दल स्पष्टीकरण द्यावे असे ‘नेटफ्लिक्स’ला सांगण्यात आले आहे. यातील दहशतवाद्यांची मानवी बाजू दाखवण्यात आल्याचा आरोप करत काही प्रेक्षकांनी टीका केली आहे. (Netflix)

बॉयकॉट बॉलिवूड हॅशटॅग ट्रेंड
‘‘कोणालाही या देशाच्या लोकांच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार नाही. भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे नेहमीचा आदर करण्यात आला आहे,’’ असे एका अधिकाऱ्याने सांगितले. आमच्या सांस्कृतिक मूल्यांना परदेशी लोकांनी नेभळट ठरवण्यास आम्ही परवानगी द्यावी का असा प्रश्न त्यांनी विचारला. तुम्ही उदारमतवादी असू शकता पण चुकीच्या पद्धतीने संस्थांशी खेळू शकत नाही असे ते म्हणाले. अपहरणकर्त्यांची समुदाय ओळख लपवण्यासाठी त्यांची ‘शंकर’ आणि ‘भोला’ अशी नावे ठेवण्यात आल्याचा आरोप काही प्रेक्षकांनी केला आहे. ‘एक्स’सारख्या समाजमाध्यमांवर बॉयकॉट ‘नेटफ्लिक्स’, बॉयकॉट बॉलिवूड आणि आय८१४ असे अनेक हॅशटॅग चालवण्यात येत आहेत. (Netflix)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.