-
ऋजुता लुकतुके
मारुती स्विफ्टची चौथ्या पिढीतील कार खास भारतीय बाजारपेठेसाठी बनलीय. अलीकडेच ही कार भारतात लाँच झाली. आणि लगेचच मारुतीच्या चाहत्यांच्या या गाडीवर उड्या पडल्या. आता हायब्रिड कारही लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. कुटुंबाची कार असा लौकिक भारतीय बाजारपेठेत मारुतीने मिळवला आहे. २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात या कारचं दर्शन लोकांना झालेलं होतं. गेल्यावर्षी या गाडीच्या टेस्ट ड्राईव्ह भारतीय रस्त्यांवरही सुरू होत्या. अशा चाचण्यांच्यावेळी दिसलेल्या कारवरून ती कशी असेल याचा चांगला अंदाज बांधता येतो. आधीच्या स्विफ्टच्या मानाने नवीन गाडीच्या इंटिरिअरमध्ये बरेच बदल झाले आहेत. (Maruti Swift 2024)
(हेही वाचा- National Crime Records Bureau Report: अत्याचाराच्या घटनेत ‘युपी’ पहिल्या क्रमांकावर तर, महाराष्ट्र कितव्या स्थानी?)
गाडीतील इन्फोटेनमेंट डिस्प्ले ९ इंचांचा आहे. एशी व्हेंट नवीन आणि जास्त प्रभावी आहेत. डॅशबोर्डही नवीन आहे. गाडीचा लुकही थोडाफार बदलला आहे. जुन्या इंग्लिश गाडीचा व्हिंटेज लुक तिला आहे. खासकरून मागच्या बाजूने. गाडीचं ग्रील बदललंय. बंपरही आधुनिक आहे. शिवाय मागच्या सीटचं दार उघडण्यासाठीचं हँडल आता दरवाजालाच देण्यात आलं आहे. (Maruti Swift 2024)
This is the new generation #MarutiSuzuki #Swift. And, it mostly sticks to the same formula that has made the Swift nameplate such a legend. As a result, it is a standout design. #marutisuzukiswift #suzukiswift #marutiswift #ctphotos #cars #automobiles #carupdates pic.twitter.com/AbIE18H4oI
— CarTrade.com (@Car_Trade) September 2, 2024
चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गाडीत ६ एअरबॅग आहेत. चालकाच्या सुरक्षेसाठी एबीएस प्रणाली आहे. तर मुलांच्या सीटसाठीही विशेष सुरक्षा आहे. नवीन स्विफ्टचं इंजिनही बदलण्यात आलंय. नवीन गाडीत आहे १.३ पेट्रोल इंजिन, ज्याला ३ सिलिंडर जोडण्यात आलेत. ५ स्पीड मॅन्युअल तसंच ऑटोगिअर बॉक्सचा पर्याय तुम्हाला देण्यात आलाय. भारतात एप्रिल महिन्यात नवीन स्विफ्ट लाँच होऊ शकते. (Maruti Swift 2024)
(हेही वाचा- Tata Curvv : टाटाची १० लाखांच्या खालील नवीन कूप एसयुव्ही कर्व्ह बाजारात दाखल )
गाडीची किंमत ६ लाख रुपयांपासून सुरू होईल. या गाडीची स्पर्धा असेल ती ह्युंदे आय१० निऑसशी. (Maruti Swift 2024)