Yograj Singh on Kapil Dev : युवराज सिंगचे वडील योगराज, कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनीवर का चिडले?

Yograj Singh on Kapil Dev : योगराज सिंग वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहेत

119
Yograj Singh on Kapil Dev : युवराज सिंगचे वडील योगराज, कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनीवर का चिडले?
Yograj Singh on Kapil Dev : युवराज सिंगचे वडील योगराज, कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनीवर का चिडले?
  • ऋजुता लुकतुके

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचे (Yuvraj Singh) वडील योगराज सिंग (Yograj Singh) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. ते भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) आणि एमएस धोनीवर (MS Dhoni) संतापले आहेत. (Yograj Singh on Kapil Dev)

एक कसोटी आणि ६ एकदिवसीय सामने खेळलेल्या योगराज यांनी यूट्यूब चॅनल झी स्विचला सांगितले की, ‘मी माझ्या आयुष्यात धोनीला कधीही माफ करणार नाही.’ त्यांची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.  योगराज कपिल देवसाठी म्हणाले- ‘त्याने मला १९८१ मध्ये मला संघातून काढून टाकले, मी त्याला म्हटले होते की, असे हाल करीन की जग तुझ्यावर थुंकेल.’ (Yograj Singh on Kapil Dev)

(हेही वाचा- Saina Nehwal : ‘या’ आजारामुळे सायना नेहवाल करतेय निवृत्तीचा विचार )

योगराज म्हणाले, ‘मी एमएस धोनीलाही माफ करणार नाही. त्याने आपला चेहरा आरशात पाहावा. तो महान क्रिकेटपटू आहे, पण त्याने माझ्या मुलाविरुद्ध काय केले हे सगळ्यांना माहीत आहे. त्याला आयुष्यात कधीच माफ करता येणार नाही. मी आयुष्यात कधीच दोन गोष्टी केल्या नाहीत. पहिली, ज्याने माझ्यावर अन्याय केला असेल त्याला मी कधीच माफ केले नाही आणि दुसरी, मी आयुष्यात त्यांना कधीच स्वीकारले नाही, मग ते माझे कुटुंबीय असोत किंवा माझी मुले.’ (Yograj Singh on Kapil Dev)

याच मुलाखतीत योगराज सिंग (Yograj Singh) यांनी १९८३ चा विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव यांच्यावरही भाष्य केले होते. १९८१ मध्ये भारतीय संघातून वगळण्यात आल्यापासून कपिल देव यांच्यासबतचे त्यांचे संबंध ताणले गेल्याचा दावा त्यांनी केला. कपिलने त्यांना आपला प्रतिस्पर्धी मानून संघातून वगळले होते, असे योगराज यांचे मत आहे. (Yograj Singh on Kapil Dev)

(हेही वाचा- BoycottNetflix का होतंय ट्रेंड? ‘Netflix’ला केंद्र सरकारची नोटीस! काय आहे कारण?)

योगराज सिंग (Yograj Singh) म्हणाले, ‘मला आयुष्यात लोकांना दाखवायचे आहे की योगराजने काहीतरी केले आहे, जे तुम्ही खाली आणले आहे. आज संपूर्ण जग माझ्या चरणी उभे आहे, मला आणि त्या लोकांना सलाम करत आहे ज्यांनी खूप वाईट कृत्ये केली होती… काहींना कर्करोग झाला आहे, काहींचे घर गेले आहे आणि काहींना घरी मुलगा नाही. मी कोणाबद्दल बोलतोय ते तुम्हाला समजले आहे… तो तुमचा आजवरचा सर्वात महान कर्णधार श्री कपिल देव आहे, मी त्यांना सांगितले होते की असे हाल करीन की जग तुझ्यावर थुंकेल. आज युवराज सिंगकडे १३ ट्रॉफी आहेत आणि तुमच्याकडे फक्त एक आहे, वर्ल्ड कप. (Yograj Singh on Kapil Dev)

धोणीलाही योगराज यांनी लक्ष्य केलं. योगराज यांनी धोनीवर निशाणा साधण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या वर्षाच्या सुरुवातीला, ६६ वर्षीय माजी क्रिकेटपटूने दावा केला होता की धोनीच्या चुकीच्या कृत्यांमुळे चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल २०२४ हरले. धोनी युवराजचा मत्सर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. (Yograj Singh on Kapil Dev)

(हेही वाचा- Paris Paralympic Games : सुमित अंतिलला पॅरालिम्पिक विक्रमासह सुवर्ण, स्वत:चाच विक्रम मोडला)

योगराज म्हणाले होते की, ‘चेन्नई आयपीएल २०२४ हरले. ते का हरले? तुम्ही जे पेराल तेच उगवेल. युवराज सिंग आयसीसीचा राजदूत, त्याला सलाम! अहंकारी धोनी, कुठे आहे तो? त्याने युवराजशी हस्तांदोलनही केले नाही आणि म्हणूनच चेन्नई या वर्षी अपयशी ठरला.’  (Yograj Singh on Kapil Dev)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.