Haryana Assembly Election : उत्तर प्रदेशच्या नेत्यांची हरियाणात ‘दंगल’

137
Haryana Assembly Election : हरियाणात मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला
  • प्रतिनिधी

उत्तर प्रदेशातील प्रादेशिक पक्ष हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या (Haryana Assembly Election) रिंगणात उतरून पक्षाच्या कक्षा विस्तारण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येत आहे. यात समाजवादी पक्ष, रालोद आणि आझाद समाज पक्ष प्रमुख आहे. हरियाणा आणि जम्मू काश्मीरात विधानसभेची निवडणूक होत आहे. यात देशाची राजधानी दिल्लीच्या सीमेला लागून असलेल्या हरियाणाच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशातील राजकीय पक्ष इंटरेस्ट दाखवित आहेत. यूपीतील राजकीय पक्ष हरियाणाच्या माध्यमातून देशाच्या राजकारणात स्वत:चे महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

हरियाणा (Haryana Assembly Election) हे उत्तर प्रदेशचे शेजारी राज्य आहे. येथील भौगोलिक परिस्थिती, सामाजिक रचना, समस्या, जातीय आणि राजकीय समीकरणे उत्तर प्रदेशशी मिळतीजुळती आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील प्रादेशिक पक्षांना हरियाणातील राजकारणाचा मार्ग सोपा वाटतो. यात माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष, माजी मुख्यमंत्री मायावती यांचा बहुजन समाज पक्ष, केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी यांचा राष्ट्रीय लोकदल आणि खासदार चंद्रशेखर आझाद यांचा आझाद समाज पक्ष प्रमुख आहेत.

(हेही वाचा – Aadhaar Update : आधारकार्ड मोफत अपडेट कसं करायचं? काय आहे प्रक्रिया?)

लोकसभेच्या निवडणुकीत मायावती यांच्या बसपाला एकही जागा जिंकता आली नाही. मात्र, आता बसपा हरियाणाच्या रिंगणात उतरण्याची तयारी करीत आहे. इंडियन नॅशनल लोकदलासोबत हातमिळवणी करीत बसपा हरियाणात ३४ जागा लढविणार आहे. तर, चंद्रशेखर आझाद यांच्या पक्षाने जननायक जनता पार्टीसोबत आघाडी करून २० जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष सुद्धा हरियाणात कॉंग्रेसशी आघाडी करून मैदानाच्या विचारात आहे. सपाने पाच जागांची मागणी केली आहे. परंतु, हरियाणात (Haryana Assembly Election) कोणत्याही पक्षाला सोबत न घेता स्वबळावर लढण्याचा आग्रह कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी धरला आहे.

याशिवाय, रालोआचा घटक पक्ष रालोद सुद्धा हरियाणात (Haryana Assembly Election) इच्छुक आहे. हरियाणात जाट मतदारांची संख्या बरीच असल्यामुळे भाजपाही रालोदला सोबत घेऊन जाट मतदारांना आपल्याकडे ओढण्याची योजना आखत आहे. भाजपा रालोदला दोन जागा देणार असल्याची चर्चा आहे. महत्त्वाचे सांगायचे म्हणजे, बसपाला सोडले तर यूपीतील एकाही पक्षाने आतापर्यंत हरियाणात निवडणूक लढविलेली नाही. २००० पासून प्रत्येक निवडणुकीत बसपाचा एक आमदार निवडून येत आहे आणि दर निवडणुकीत मतदांची टक्केवारी सुद्धा वाढत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.