शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट दरम्यान भुयारी मेट्रो (Underground Metro) मार्ग आणि स्थानकांची बहुतांश कामे पूर्ण झाले असले तरी, प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अजून वेळ लागणार असल्यामुळे प्रवाशांना महिनाअखेरपर्यंत वाट पाहवी लागणार आहे. दरम्यान, मेट्रोच्या विस्तारीत मार्गांचेही भूमिपूजन आणि भुयारी मेट्रोसह स्वारगेट स्थानकाचे लोकार्पण, एकाचवेळी करण्याचा प्रयत्न आहे.
(हेही वाचा – PUNE : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अधिकृतपणे तात्पुरती वीजजोडणी घ्यावी; महावितरणचे आवाहन)
पिंपरी चिंचवड-शिवाजीनगर न्यायालयापर्यंत मेट्रो सध्या कार्यान्वित झाली आहे. याच मार्गावर शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट दरम्यान भुयारी मेट्रो (Underground Metro) असेल. त्याचे काम सध्या पूर्णत्वास आले आहे. केंद्रीय सहकार आणि विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ यांनी स्वारगेट मेट्रो स्थानकाची पाहणी करून भुयारी मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आणि मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.
(हेही वाचा – Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या विधानसभेत अपराजिता महिला-बाल सुरक्षा विधेयक सादर!)
शिवाजीनगर न्यायालय-स्वारगेट दरम्यान मेट्रोचे बुधवार पेठ (कसबा गणपती), महात्मा फुले मंडई आणि स्वारगेट स्थानके आहेत. त्यातील महात्मा फुले मंडई स्थानकाचे काम पूर्ण होण्यास आणखी दहा दिवसांचा अवधी लागणार असल्याचे हर्डीकर यांनी स्पष्ट केले. केंद्रीय रेल्वे सुरक्षा मंडळाच्या पथकाने भूमिगत मेट्रो (Underground Metro) मार्ग आणि तिन्ही स्थानकांची पाहणी केली. त्यांच्या सूचनांनुसार बदल करण्यात आले आहेत. आता पुन्हा पाहणी होऊन सुरक्षितताविषय प्रमाणपत्र मिळेल. त्यानंतर वाहतूक सुरू करण्याचा निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community