ST Bus Strike : एसटीचा संप सुरूच; बैठकीतील आवाहनांना प्रतिसाद नाही

150
ST Bus Strike : एसटीचा संप सुरूच; बैठकीतील आवाहनांना प्रतिसाद नाही

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या मागणीवरून सुरू असलेल्या संपाची (ST Bus Strike) तीव्रता वाढत चालली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी मंगळवारी (३ सप्टेंबर) झालेली बैठक निष्फळ ठरली, त्यामुळे संप आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. गणेशोत्सवाच्या तोंडावर लाखो प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची जाणीव असतानाही, कर्मचारी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. जोवर आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोवर संप मागे घेणार नाही, असा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सामंत यांनी मध्यस्थी करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, परंतु कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले की, केवळ आश्वासनांवर संप मागे घेतला जाणार नाही.

(हेही वाचा – ओलीसांना वाचवण्यात अपयशी ठरल्याबद्दल PM Benjamin Netanyahu यांनी मागितली माफी)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याशी बुधवारी होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष आहे. या बैठकीत सरकारची भूमिका निर्णायक ठरू शकते. दरम्यान, सत्ताधारी पक्षातील नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनीही कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभे राहून सरकारला इशारा दिला आहे. आम्ही सरकारी पक्षात असलो तरी एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. पगारवाढ तातडीने न झाल्यास राज्यभरातील एसटी कर्मचारी मंगळवार रात्रीपासून संपावर (ST Bus Strike) जातील, असा खळबळजनक इशारा त्यांनी दिला आहे.

(हेही वाचा – Ganeshotsav 2024 : जुहू चौपाटी, वेसावे चौपाटीवर महानगरपालिका आयुक्त फिरले)

या संपामुळे (ST Bus Strike) राज्यातील सार्वजनिक वाहतूक यंत्रणा ठप्प होण्याची शक्यता असून, सरकारने त्वरित तोडगा न काढल्यास गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. संपाच्या पुढील टप्प्यात काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, आणि मुख्यमंत्री शिंदे यांची भूमिका या संघर्षात निर्णायक ठरू शकते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.