सरकारकडे लाडक्या शेतकऱ्यासाठी पैसे नाहीत – Sanjay Raut

190
सरकारकडे लाडक्या शेतकऱ्यासाठी पैसे नाहीत - Sanjay Raut
सरकारकडे लाडक्या शेतकऱ्यासाठी पैसे नाहीत - Sanjay Raut
मराठवाड्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने हैदोस माजवला आहे. संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, परभणी,हिंगोली,नांदेड अशा सगळ्याच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर परभणी, हिंगोली, नांदेड या तीन जिल्ह्यात ५ लाख ८ हजार ६८ हेक्टर वरील पिकांचं नुकसान झालं.याच जिल्ह्यातील ६ लाख २० हजार ९८० शेतकऱ्यांना फटका बसला आहे. याचपार्श्वभूमीवर बुधवारी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) खासदार संजय राऊत आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas danve) हे मराठावाडा दौऱ्यावर  निघताना पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली. (Sanjay Raut)
सरकारकडे इतर सर्व वायफळ कामासाठी पैसे आहेत. पण शेतकरी जेव्हा मरणपंथाला लागतो, त्याच आयुष्य वाहून जातं तेव्हा शेतकरी आपला लाडका आहे, असं या सरकारला कधीच वाटलेलं नाही. पाच पंचवीस खोके शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी, नुकसान भरपाईसाठी द्यावेत ही या सरकारची भावना किंवा मानसिकता नाही, अशी सडकून टीका संजय राऊत यांनी केली. मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुंबईतून निघताना संजय राऊत माध्यमांशी बोलत होते. (Sanjay Raut)
नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावे – मुख्यमंत्री
मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यासह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या विदर्भासह इतर भागातील जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये नुकसानीचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. (Sanjay Raut)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.