गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात (Konkan Railway) जायला निघाले असतानाच एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. कोकणच्या दिशेनं निघालेल्या चाकरमान्यांकडे एसटीचं आरक्षण असताना त्यांनाही या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. यामुळे कोकण रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवानिमित्त आणखी एक अनारक्षित ट्रेन चालवण्याचा निर्णय कोकण रेल्वेकडुन घेण्यात आला आहे.
कोकण रेल्वेनं (Konkan Railway) अधिकृत माहिती देत ट्विटर वर पोस्ट केली आहे. ‘प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेच्या वतीनं गणेशोत्सवानिमित्त आणखी एक अनारक्षित ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे’, असं कोकण रेल्वेकडून सांगण्यात आलं. कोकण रेल्वेच्या माहितीनुसार गाडी क्रमांक 01103/01104 मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघून कुडाळ आणि पुन्हा सीएसएमटी असा पूर्ण प्रवास करेल.
Running of Additional Unreserved Ganpati Special Train. pic.twitter.com/vCRkG6CqPf
— Konkan Railway (@KonkanRailway) September 3, 2024
अधिकृत माहितीनुसार या गाडीला 20 कोच असून त्यापैकी 14 कोच जनरल श्रेणीतील असतील, तर चार कोच स्लीपर असतील. या रेल्वेसंदर्भातील सविस्तर माहितीसाठी प्रवाशांना रेल्वेच्या वेबसाईटसह आयआरसीटीसी (IRCTC)च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन करण्यात येत आहे. (Konkan Railway)
गाडी क्रमांक 01103 मुंबई छशिमट- कुडाळ विशेष (अनारक्षित)ट्रेन निर्धारित स्थानकातून 4 आणि 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी कुडाळ रोखानं प्रवास सुरु करेल. ही रेल्वे दुसऱ्या दिवशी दुपारी 3.30 वाजता कुडाळला पोहोचेल. (Konkan Railway)
गाडी क्रमांक 01104 कुडाळ- मुंबई छशिमट (विशेष) अनारक्षित निर्धारित स्थानकातून 5 आणि 7 सप्टेंबरला पहाटे 4.30 वाजता प्रवास सुरू करून त्याच दिवशी सायंकाळी 4.40 वाजता मुंबईत पोहोचेल. (Konkan Railway)
‘इथे’ असणार थांबे (Konkan Railway)
ही विशेष रेल्वे दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळून, कामाठे, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग इथं थांबेल.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community