Hariyana Vidhana Sabha Election 2024 : कुस्तीपटू विधानसभेच्या रिंगणात काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित

120
Hariyana Vidhana Sabha Election 2024 : कुस्तीपटू विधानसभेच्या रिंगणात काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित
Hariyana Vidhana Sabha Election 2024 : कुस्तीपटू विधानसभेच्या रिंगणात काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित
हरियाणा विधानसभा (Hariyana Vidhana Sabha Election 2024) निवडणूक यावेळी जिंकायचीच, या हेतूने  काँग्रेस पक्ष मैदानात उत्तरताना दिसत असून माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते भूपेंद्र हुडा (Bhupinder Hooda) यांना उमेदवारी वाटपात पूर्ण मुभा दिली गेली असल्याची  माहिती आहे.
मिळालेल्या माहिती नुसार कोणाशी आघाडी करायची, याचीही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हुडा पांना पूर्ण मोकळीक दिली आहे. (Hariyana Vidhana Sabha Election 2024)

(हेही वाचा- World Test Championship : कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना लॉर्ड्सवर ‘या’ दिवशी रंगणार)

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची जरी राज्यात आम आदमी पार्टीसोबत आघाडी करण्याची इच्छा असली तरी हुडा यांना त्यांच्यापेक्षा राज्यातील परिस्थितीची अधिक सखोल माहिती असल्यामुळे ते आपला सोबत घेण्यास फारसे उत्सुक नसल्याचे समजते. (Hariyana Vidhana Sabha Election 2024)

दरम्यान, काँग्रेसकडून महिला कुस्तीपटू विनेश फोगटशी (Vinesh Phogat) संपर्क साधण्यात आला असून कोणत्या जागेवरून लढण्याची इच्छा आहे, अशी विचारणा करण्यात आली आहे. तूर्तास बपरा आणि दादरी हे दोन पर्याय पक्षाने विनेशसमोर ठेवले आहेत. स्वतः विनेशनेही आपण जी जागा मागू तेथून आपल्याला उमेदवारी दिली जाणार असल्याचे महटले आहे. कुस्तीपटू बजरंग पुनियानेही बादली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी मागितली आहे. मात्र त्याला बहादूरगड आणि गिवानी है दोन पर्याय देण्यात आले आहेत. (Hariyana Vidhana Sabha Election 2024)

(हेही वाचा- Veer Savarkar : देवळाली कॅम्प येथील डॉ. सुभाष गुजर विद्यालयाला वीर सावरकर यांची मूर्ती भेट)

आता निर्णय त्याच्यावर सोपवण्यात आला आहे. तथापि, बजरंग आणि विनेश या दोघांनाही रिंगणात उतरवण्याचा पूर्ण निश्चय काँग्रेसने केला आहे. तसे करून महिला कुस्तीपटूंसोबत जे झाले  त्याचे मतदारांना स्मरण करून देत भारतीय जनता पार्टीची कोंडी करण्याचा काँग्रेसचा डाव आहे. लालूप्रसाद यादव यांचे जावई चिरंजीव राय यांचीही रेवाडी मतदारसंघातून उमेदवारी फायनल झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. (Hariyana Vidhana Sabha Election 2024)

हेही पहा-  
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.