Maharashtra Rain: आता कोकणात मुसळधार! ऐन गणपतीत उडणार तारांबळ

98
Maharashtra Rain: आता कोकणात मुसळधार! ऐन गणपतीत उडणार तारांबळ
Maharashtra Rain: आता कोकणात मुसळधार! ऐन गणपतीत उडणार तारांबळ

विदर्भ आणि मराठवाड्यातील पावसाचा जोर (Maharashtra Rain) कमी झाल्याचे दिसून आले असले तरी, आता कोकण (Konkan) आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचे आगमन होणार आहे. गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) तोंडावर येणाऱ्या या पावसामुळे कोकणातील चाकरमान्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा-‘…तर शिवरायांचा पुतळा कोसळला नसता’, नेमकं काय म्हणाले Nitin Gadkari?)

देशभरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाची स्थिती गंभीर आहे. राजस्थानपासून बंगालच्या उपसागरापर्यंत आणि गुजरातच्या दक्षिणेपासून केरळच्या मध्य किनारपट्टीपर्यंत सक्रिय असलेल्या या पट्ट्यामुळे कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचे थैमान सुरू होणार आहे. विदर्भातील काही भागांत पावसाची तडाखा सुरूच राहील, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. (Maharashtra Rain)

सातारा आणि पुणे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे, तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिकसह इतर काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. देशातील २० राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. (Maharashtra Rain)

(हेही वाचा-Konkan Railway: खोळंबलेल्या एसटीमुळे कोकण रेल्वेचा चाकरमान्यांना मदतीचा हात; आणखी एका विशेष रेल्वेची घोषणा)

आयएमडीच्या माहितीनुसार, तेलंगण, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, पश्चिम बंगाल, असम, मेघालय, नागालैंड, मणिपुर, मिजोरम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, सिक्किम, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, राजस्थान, गोवा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेशात वादळी पावसाचे संकेत आहेत. (Maharashtra Rain)

सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाचा जोर कमी होईल, परंतु गणपती उत्सवाच्या काळात पावसाच्या सरींमुळे कोकणातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. हवामान विभागाने यासाठी सजग राहण्याचे आणि आवश्यक तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Maharashtra Rain)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.