Haryana Legislative Assembly : राहुल गांधी का घाबरले?

162
Haryana Legislative Assembly: राहुल गांधी का घाबरले?
Haryana Legislative Assembly: राहुल गांधी का घाबरले?

हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत (Haryana Legislative Assembly) इंडी आघाडीतील एकाही पक्षाला सोबत न घेण्याच्या मुद्यावर अडून बसलेला काँग्रेस पक्ष अचानक एकजुटीने लढण्याची भाषा बोलू लागला आहे. काँग्रेसचा अंतर्गत सर्वेक्षण अहवाल बघितल्यानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) खडबडून जागे झाले आणि आप तसेच सपाला सोबत घेऊन मैदानात उतरण्याची भाषा बोलू लागले आहेत. याचा अर्थ राहुल गांधी (Rahul Gandhi) घाबरले आहेत असेच दिसून येते.

निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली असून उमेदवार निवडीसाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. अशातच पक्षाचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या मनात आघाडीची चक्रे फिरू लागल्याचे समजते. पक्षाने राज्यात सर्व 90 जागांवर लढण्याची तयारी केलेली असताना राहुल यांना कसली भीती सतावत आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुलात रंगली आहे.

(हेही वाचा – Hariyana Vidhana Sabha Election 2024 : कुस्तीपटू विधानसभेच्या रिंगणात काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित)

आप सोबत आघाडी करण्यासाठी तत्पर

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आम आदमी पक्षासोबत आघाडी करण्याबाबत चाचपणीच्या सुचना राज्यातील नेत्यांना दिल्या आहेत. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत त्यांनी नेत्यांकडून आघाडीबाबत सुचना मागवल्या आहेत. एका ज्येष्ठ नेत्यावर आघाडीची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे समजते. (Haryana Legislative Assembly)

(हेही वाचा – World Test Championship : कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना लॉर्ड्सवर ‘या’ दिवशी रंगणार)

हरियाणा काँग्रेसचा एकला चलो साठी आग्रह

दुसरीकडे हरियाणा काँग्रेसला एकट्याने लढल्यास विजय मिळवण्याचा आत्मविश्वास आहे. पक्षाचे नेते भूपेंद्र सिंह हुडा यांनी एकट्याने लढणार आणि जिंकणार, असे म्हटले आहे. आपनेही आघाडीत चार-पाच जागांवर लढण्यापेक्षा सर्व 90 जागांवर उमेदवार देण्याबाबत सूचक विधान केले आहे. पण आघाडीच्या भूमिकेबाबत राहुल यांची नेमकी भूमिका काय असू शकते, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. (Haryana Legislative Assembly)

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या उपस्थितीत जम्मू आणि काश्मीरमध्येही फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांच्या पक्षासोबत आघाडी करण्यात आली आहे. हरियाणामध्येही त्यांना आघाडी हवी आहे. त्यांचे लक्ष्य राष्ट्रीय राजकारण असल्याचे मानले जात आहे. इंडी आघाडीतील सर्व मित्रपक्षांमध्ये एकजुट दिसावी, अशी त्यामागची भावना असल्याचे दिसते. (Haryana Legislative Assembly)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.