MNS म्हणते, गणपतीचे साहित्य गावातच खरेदी करा, मुंबईत परप्रांतियांकडून नको !

694
MNS म्हणते, गणपतीचे साहित्य गावातच खरेदी करा, मुंबईत परप्रांतियांकडून नको !
MNS म्हणते, गणपतीचे साहित्य गावातच खरेदी करा, मुंबईत परप्रांतियांकडून नको !
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई

सध्या गणेशोत्सवाकरता दादरसह अनेक विभागातील बाजारपेठा गर्दीने फुलल्या असून गणेशोत्सवाकरता विविध वस्तू तसेच इतर साहित्यांची विक्री करण्यासाठी मोठ्याप्रमाणात रस्तोरस्ती धंदे थाटून बसले आहेत. मात्र, मुंबईतील परप्रांतिय फेरीवाल्यांकडून गणपतीचे साहित्य घेण्याऐवजी चाकरमन्यांनी गावातूनच याचे साहित्य खरेदी करावे अशाप्रकारचे आवाहनच मनसेकडून (MNS) केले जात आहे. मनसेचे नेते शिरीष सावंत यांनी समाज माध्यमावर ही पोस्ट टाकून कोकणात जाणाऱ्या लोकांना हे आवाहन केले आहे.

(हेही वाचा – Piyush Goyal : खासदार पियूष गोयल यांच्यासाठी महापालिका मुख्यालयच हलवले बोरीवलीत)

शिरीष सावंत यांनी फेसबूकवरील पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, रविवारी दादरला गेलो होतो, जास्तीत जास्त मला मराठी माणूस गावी कोकणात गणपतीला जाणार म्हणून खरेदीसाठी आला होता. गर्दी तुम्हाला काय सांगू, पाय ठेवायला जागा नाही. स्टेशन पासून ते शिवसेना भवन पर्यंत तुडुंब गर्दी. धड चालायला पण भेटत नव्हते आणि हाच आपला मराठी कोकणी माणूस गणपती साठी खरेदी कोणाकडे करतोय तर रोड वरील धंदा लावलेल्या परप्रांतीय माणसाकडे. काय गरज. ह्यांच्या कडे आपण खरेदी करुन आपण ह्यांनाच मोठे करतोय ना ? का गावी कोकणात आपल्या सर्व काही मिळते. गावी गेल्यावर त्यांच्या कडे खरेदी करा. आपला मराठी कोकणी उद्योजक माणूस मोठा होईल. या मुंबईतील बाहेरच्या लोकांना मोठे करण्यापेक्षा आपल्या गावात जाऊन सर्व खरेदी करा. दोन पैसे जास्त गेलेत तरी चालतील. पण त्यामुळे आपलीच लोक मोठी होतील. आणि हो, गावी आज काल सर्व काही मिळते बघा पटल तर आणि आपले मत पण नक्की मांडा, असे म्हटले आहे.

WhatsApp Image 2024 09 04 at 8.39.45 PM e1725502533707

https://www.facebook.com/100000287987302/posts/pfbid0bpiSKfRrTfWVSvPwdwwwjd7DYvFgcU8WvVFtYKVoLh3qSAvRcBk2nHg6yniShCHkl/?app=fbl 

विशेष म्हणजे या पोस्टवर अनेकांनी सहमती दर्शवली असून मुंबईतील फेरीवाल्यांकडे साहित्य खरेदी करण्याऐवजी दोन पैसे जास्त मोजून स्थानिक पातळीवर म्हणजे गावातीलच बाजारांमध्ये जावून या वस्तूंची खरेदी केल्यास गावातील लोकांचे हात मजबूत होती आणि यातील पैसा आपल्याच बांधवाकडे राहिल अशाप्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. तर अनेकांनी आम्ही याची अंमलबजावणी केली असून आम्ही महत्वाचे साहित्य मुंबईत घेतो आणि इतर साहित्य गावी घेतो , यामुळे गावी जाताना साहित्याचे वजन वाढत नाही,असे म्हटले आहे. तसेच गावी सगळ्याच वस्तू मिळत असल्याने मुंबईतून काही नेण्याची गरजच भासत नाही,असेही काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे मनसेच्या या आवाहनानंतर किती परिणाम याकडे सर्वांचे लक्ष आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.