उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अमरोहा जिल्ह्यातील एका इंटर कॉलेजमधील हिंदू विद्यार्थ्यांनी आपल्या प्राचार्य मोहसीन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. प्राचार्य मोहसीन अली यांनी त्यांना हाताला गंडदोरे बांधण्यास, तसेच कपाळावर टिळा लावण्यापासून रोखल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. या विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, कॉलेजमधील मुस्लिम विद्यार्थ्यांना शुक्रवारच्या नमाजासाठी बाहेर जाण्यास परवानगी दिली जाते. या प्रकरणाची माहिती मिळताच ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ (ABVP) शी संबंधित विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला आणि प्राचार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
ही घटना (Uttar Pradesh) अमरोहा जिल्ह्यातील गजरौला पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली. मंडी समिती मार्गावरील पियर्स चढ्ढा इंटर कॉलेजमध्ये जवळपासच्या भागातील अनेक विद्यार्थी शिकतात. बुधवारी अभाविपशी संबंधित विद्यार्थ्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यात बजरंग दलाचे सदस्यही सामील झाले. प्राचार्य मोहसीन अली हे हिंदू आणि मुस्लिम विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करतात, असा आंदोलकांचा आरोप आहे. त्यांनी सांगितले की मोहसीन अली हिंदू विद्यार्थ्यांना टिळा लावण्यास आणि गंडेदोरे बांधण्यास विरोध करतात.
या विद्यार्थ्यांनी पुढे सांगितले की, मोहसीन यांचे मुस्लिम विद्यार्थ्यांबाबतचे वागणे पूर्णपणे वेगळे आहे. मुस्लिम विद्यार्थ्यांना प्रार्थना करताना हात न जोडण्यास सांगितले जाते. तसेच त्यांना शुक्रवारी सुटी देण्यात आली आहे. मोहसीन अली यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली. कॉलेजच्या गेटवर भारत माता की जय, जय श्री राम आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणा देण्यात आल्या. गोंधळाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ महाविद्यालय गाठले. आंदोलक विद्यार्थ्यांना समजावल्यानंतर शांत करण्यात आले. (Uttar Pradesh)
या गोंधळाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्राचार्य मोहसीन अली यांचीही मुलाखत घेण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात मोहसीन अली यांचे वक्तव्यही समोर आले आहे. मोहसीन यांनी सांगितले की, नुकतेच त्यांनी कॉलेजचे व्यवस्थापन हाती घेतले आहे. जे काही नियम पाळले जात होते ते आधी केले गेले. प्रशासनाच्या उपस्थितीत या नियमांमध्ये सुधारणा करण्याचा करार झाला. या कराराचा लेखी पुरावाही देण्यात आला. अखेर बऱ्याच संघर्षानंतर प्रकरण बंद करण्यात आले.
Join Our WhatsApp Community