Bus Accident : कोकणात जाणाऱ्या दोन बसचा कशेडी घाटात अपघात; जीवितहानी नाही

159
Bus Accident : कोकणात जाणाऱ्या दोन बसचा कशेडी घाटात अपघात; जीवितहानी नाही
Bus Accident : कोकणात जाणाऱ्या दोन बसचा कशेडी घाटात अपघात; जीवितहानी नाही

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या दोन बस कंटेनरवर धडकल्या. कशेडी बोगद्यात बाईकला वाचवण्यासाठी कंटेनरने अचानक ब्रेक मारल्यामुळे प्रवाशांनी भरलेल्या बस एकमेकांवर आदळल्या. (Bus Accident)

गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच गावाकडे जाण्यासाठी चाकरमान्यांच्या मोठ्या रांगा महामार्गावर दिसत आहे. अशातच कशेडी घाटात कोकणात निघालेल्या दोन बसचा अपघात झाला आहे. या दोन्ही बसमध्ये 80 प्रवासी होते. या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.

(हेही वाचा – Mumbai Crime शाखेची कौतुकास्पद कारवाई, ड्रग्स माफियांना अटक करून काढली त्यांची वरात)

कशेडी बोगद्यात बाईकला वाचवण्यासाठी कंटेनरने अचानक ब्रेक मारला, त्यामुळे मागून येणाऱ्या प्रवाशांनी भरलेल्या दोन बस एकमेकांवर आदळल्या आणि भीषण अपघात झाला. बाजूने जाणारा दुचाकीस्वारही थोडक्यात बचावला आहे. अपघाताची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमधून रवाना करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गणेशोत्सव सणाला अवघे दोन दिवस शिल्लक राहिलेले आहे. मुंबईकर चाकरमानी लाखोंच्या संख्येने कोकणाकडे येण्यासाठी निघाले आहेत. मात्र, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव ते लोनेरे या दहा किलोमीटरच्या परिसरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. गणेशभक्तांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्गावर रखडलेल्या कामाच्या ठिकाणी ही वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळत आहे. अशातच आता अपघातामुळे वाहतूक कोंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. (Bus Accident)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.