Hindus in Bangladesh : बांगलादेशात पोलीस ठाण्यातच झाली हिंदु युवकाची हत्या

222
Hindus in Bangladesh : बांगलादेशात पोलीस ठाण्यातच झाली हिंदु युवकाची हत्या
Hindus in Bangladesh : बांगलादेशात पोलीस ठाण्यातच झाली हिंदु युवकाची हत्या

सामाजिक माध्यमांवर महंमद पैगंबर यांचा अपमान केल्याच्या कथित आरोपावरून हिंसक मुसलमान जमावाने हिंदु युवकाची हत्या केली आहे. उत्सव मंडल (वय १८ वर्षे) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे ही घटना पोलीस ठाण्याच्या आवारातच पोलीस आणि बांगलादेशी सेनादलांच्या समोरच घडली. 4 सप्टेंबर रोजी शहरातील सोनाडांगा निवासी परिसरात ही हत्या करण्यात आली आहे. (Hindus in Bangladesh)

(हेही वाचा – BMC School : शिक्षकांच्या भरती प्रक्रियेत महापालिका शिक्षण विभागाची उदासिनता, मार्च महिन्यात प्रक्रिया राबवूनही सप्टेंबर पर्यंत नियुक्ती नाही!)

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, खुलना महानगर पोलीस उपायुक्त (दक्षिण) महंमद ताजुल इस्लाम यांनी 18 वर्षीय हिंदू तरुणाच्या हत्येच्या घटनेला दुजोरा दिला आहे.

महानगर उपायुक्तांनी दिला दुजोरा

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, खुलना येथील आझम खान शासकीय वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी फेसबुकवर महंमद पैगंबर यांच्यावर काही पोस्ट शेअर केल्याचा आरोप आहे. संध्याकाळी अनेक मुसलमान विद्यार्थी हिंदू युवकाला सोनाडांगा भागातील खुलना महानगर उपायुक्त (दक्षिण) ताजुल इस्लाम यांच्या कार्यालयात घेऊन गेले, तसेच मुसलमानांनी पोलीस उपायुक्त कार्यालयाला सुमारे 3 तास घेराव घातला. कथित ‘ईश्वरनिंदा’ केल्याचा आरोप करून हिंदू युवकाला शिक्षा देण्याची मागणी मुसलमान युवक करत होते.

या वेळी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी लष्कर आणि नौदलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर उत्सव मंडल याला पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले, तेव्हा धर्मांध मुसलमान जमावाने पोलीस ठाण्यातच त्याला निर्घृणपणे मारहाण केली. या मारहाणीत पोलीस आणि लष्कर यांच्या समोरच उत्सव मंडल याचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांनी मुस्लिम जमावाला आश्वासन दिले होते की हिंदू मुलाला जास्तीत जास्त शिक्षा दिली जाईल. मात्र, संतप्त जमावाने त्याला बेदम मारहाण करून ठार मारले. (Hindus in Bangladesh)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.