देवगुडा (तेलंगाणा) येथील एस. टी. गोंड या आदिवासी समाजातील 45 वर्षीय महिलेवर मुसलमान रिक्षाचालक शेख मखदूम याने लैंगिक अत्याचार केले. या वेळी महिलेने आरडाओरडा केल्यानंतर शेख मखदूम याने तिला बेशुद्ध होईपर्यंत काठीने मारहाण केली आणि ठार मारण्याच्या उद्देशाने रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत सोडले. (tribal women sexualy assaulted) ही घटना ३१ ऑगस्ट रोजी घडली. १ सप्टेंबर रोजी महिलेच्या भावाने सिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर शेख मखदूम याने एससी/एसटी कायद्यांतर्गत बलात्कार आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३ सप्टेंबर रोजी आरोपी रिक्शाचालकाला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक सदया पंथाती या प्रकरणाचे पुढील अन्वेषण करत आहेत. तपासाची जबाबदारी स्वीकारली आणि मंगळवारी आरोपी चालकाला अटक केली. (Telangana)
(हेही वाचा – Mumbai Crime शाखेची कौतुकास्पद कारवाई, ड्रग्स माफियांना अटक करून काढली वरात)
या घटनेनंतर संतप्त झालेल्या आदिवासी समाजाने आसिफाबाद जिल्ह्यातील जैनूर शहरात बंद पुकारला. या वेळी ५ सहस्र आदिवासींनी एकत्र येऊन अत्याचार करणाऱ्या धर्मांधाला फाशीची शिक्षा करण्याची मागणी केली. या वेळी काही काळ ‘रस्ता रोको’ आंदोलनही करण्यात आले.
या वेळी संतप्त जमावाने व्यावसायिक आस्थापनांवर हल्ला केला, तसेच जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला. यामुळे शहरात तणाव वाढला आहे.
Deeply disturbed by the brutal assault on tribal woman by anti-social elements in Jainoor Village,Kumuram Bheem Asifabad District.
Spoke to the victim’s family & offered support.
Contacted @TelanganaDGP Garu and sought swift and unbiased action against the perpetrators,…
— Bandi Sanjay Kumar (@bandisanjay_bjp) September 4, 2024
काँग्रेसकडून घटनेला अपघाताचा रंग देण्याचा प्रयत्न – तेलंगाणा भाजप
या घटनेविषयी ‘एक्स’ या सामाजिक माध्यमावर पोस्ट करून भाजपने काँग्रेस सरकारवर टीका केली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “शेख मखदूम हा बलात्कारी आहे. त्याने एका आदिवासी महिलेवर हल्ला केला आणि कायदेशीर परिणाम टाळण्यासाठी तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. याला अपघात म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे अल्पसंख्यांकांप्रती सहानुभूतीच्या काँग्रेसच्या राजकारणाचे आणि रेवंथ सरकारच्या निर्लज्ज राजवटीचे प्रतिबिंब आहे. (Telangana)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community