Vinesh Phogat : विनेश फोगाट काँग्रेसकडून हरियाणा निवडणूक लढवणार?

Vinesh Phogat : विनेश फोगाट आणि बजरंग यांचा राहुल गांधींबरोबरचा फोटो व्हायरल झाला आहे.

117
Vinesh Phogat : विनेश फोगाट काँग्रेसकडून हरियाणा निवडणूक लढवणार?
  • ऋजुता लुकतुके

भारताचे स्टार कुस्तीपटू आणि ब्रिजभूषण शरण यांच्याविरुद्धच्या लढ्याचे मुख्य चेहरे बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट (Vinesh Phogat) हरियाणा विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांचेही तिकीट काँग्रेसकडून जवळपास निश्चित झाले आहे. विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुरुवारी भेट घेतली होती. या बैठकीनंतर दोघं राजकारणात उतरणार असल्याच्या चर्चांना आणखी जोर आला आहे.

(हेही वाचा – Telangana मध्ये मुसलमान रिक्षाचालकाने आदिवासी महिलेवर केले लैंगिक अत्याचार)

दोघंही नेमके कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार यावर अंदाज व्यक्त केला जात आहे. बजरंग पुनिया हे बदलीमधून निवडणूक लढवणार आहेत. तर विनेश फोगाट (Vinesh Phogat) जुलानामधून निवडणूक लढवणार आहेत. हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर बजरंग आणि विनेश यांच्या राहुल गांधी भेटीमुळे चित्र काहीसं स्पष्ट झाल्याचं बोललं जात आहे.

(हेही वाचा – Rich Indian Cricketers : कुठला भारतीय क्रिकेटपटू भरतो सर्वाधिक आयकर?)

गेल्या शनिवारी शेतकरी आंदोलनाला २०० दिवस पूर्ण झाल्याबद्दल विनेश फोगाट (Vinesh Phogat) या दोन्ही कुस्तीपटूंनी शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला होता. विनेश शंभू आणि खनौरी सीमेवर गेली होती. यादरम्यान विनेशला विचारण्यात आले की ती निवडणूक लढवणार का? यावर कुस्तीपटूने उत्तर दिले की, तिला राजकारण कळत नाही, परंतु ती शेतकऱ्यांना पूर्ण पाठिंबा देते.

२७ ऑगस्ट २०२४ रोजी हरियाणातील जिंद येथे एका कार्यक्रमात विनेश फोगाटने राजकारणात येण्यासाठी तिच्यावर दबाव असल्याचे सांगितले होते. मात्र, याबाबत आपण आपल्या वडिलांचा सल्ला घेणार असल्याचेही तिने सांगितले. विनेश म्हणाली होती की, जेव्हा तिचं मन स्थिर आणि स्वच्छ असेल, तेव्हा ती पुढे काय करायचं याचा विचार करेल.

(हेही वाचा – US Open 2025 : युएस ओपन टेनिस स्पर्धेत रोहन बोपान्नाचा मिश्र दुहेरीत उपांत्य फेरीत पराभव)

काँग्रेस एक-दोन दिवसांत हरियाणातील आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करणार आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने मंगळवारपर्यंत ९० पैकी ६६ जागांसाठी उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली आहे. मात्र, नावे जाहीर केलेली नाहीत. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक-दोन दिवसांत उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. हरियाणातील विधानसभेच्या ९० जागांसाठी ५ ऑक्टोबरला मतदान होणार असून, ८ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.