railway junior engineer salary : रेल्वे ज्युनियर इंजिनियरला किती मिळतो पगार?

126
railway junior engineer salary : रेल्वे ज्युनियर इंजिनियरला किती मिळतो पगार?

रेल्वे कनिष्ठ अभियंता म्हणजेच रेल्वे ज्युनियर इंजिनियर (railway junior engineer salary) हे भारतीय रेल्वेमधील एक तांत्रिक पद आहे. रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विविध अभियांत्रिकी पैलूंवर देखरेख करणे हे त्यांचं काम असतं.

(हेही वाचा – काय आहे Pataleshwar Cave Temple चा भव्य इतिहास?)

रेल्वे ट्रॅक, पूल, सिग्नल आणि इतर पायाभूत सुविधांचे योग्य कार्य आणि देखभाल करणे, नवीन रेल्वे प्रकल्प आणि सुधारणांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात मदत करणे, सुरक्षा मानकांची पूर्तता झाली आहे याची खात्री करण्यासाठी नियमित तपासणी करणे, इतर रेल्वे कर्मचाऱ्यांना तांत्रिक सहाय्य आणि मार्गदर्शन प्रदान करणे ही त्यांची जबाबदारी आहे. (railway junior engineer salary)

(हेही वाचा – Malad Building Collapse: बांधकाम सुरू असताना २०व्या मजल्यावरुन ४ मजूर कोसळले; दोघांचा जागीच मृत्यू)

उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून अभियांत्रिकी (सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स इ.) मध्ये डिप्लोमा किंवा पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय साधारणपणे १८ ते ३३ वर्षे वयोगटातील असावे. निवड प्रक्रियेमध्ये सामान्यत: संगणक-आधारित चाचण्या दिल्या जातात, त्यानंतर दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी अशा प्रक्रिया पार पाडल्या जातात. सर्व शैक्षणिक आणि वैयक्तिक कागदपत्रे व्यवस्थित असल्याची खात्री केली जाते. उमेदवार शारीरिकरित्या तंदुरुस्त असल्याची खात्री केली जाते. (railway junior engineer salary)

(हेही वाचा – Bihar : नितीश कुमार, तेजस्वी यादव भेटीमुळे भाजपा अस्वस्थ)

पगाराची रचना :

मूळ वेतन : रु. ३५,४०० प्रति महिना.
ग्रेड पे : रु. ४,२००.
एकूण पगार : स्थान आणि इतर घटकांनुसार दरमहा रु. ४२,००० ते रु. ५२,००० एवढा पगार मिळतो. तसेच इतर भत्ता देखील मिळतो. (railway junior engineer salary)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.