- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महानगरपालिकेकडून शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार’ (Adarsh Teacher Mayor Award) जाहीर केले जातात. त्यानिमित्ताने आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार सन २०२३-२४ च्या पुरस्कारासाठी ५० शिक्षकांची नावे उप आयुक्त (शिक्षण) चंदा जाधव यांनी ०५ सप्टेंबर २०२४ महानगरपालिका मुख्यालयातील पत्रकार कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केली. याप्रसंगी महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी आदी मान्यवर उपस्थित होते.
(हेही वाचा – CM Eknath Shinde : आठ देवस्थानांच्या २७५ कोटींच्या विकास आराखड्यांना मान्यता)
शिक्षण विभागातील महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक शाळांमधील जे शिक्षक ज्ञानदानाचे व विद्यार्थी घडविण्याचे काम प्रामाणिकपणे करीत आहेत, त्यांचा यथोचित गौरव करण्याची परंपरा सन १९७१ पासून सुरू आहे. या परंपरेत आता दरवर्षी ५० आदर्श शिक्षकांना ‘महापौर पुरस्काराने’ गौरविण्यात येते. (Adarsh Teacher Mayor Award)
(हेही वाचा – Nagpur Bus Accident: नागपूरमध्ये ट्रक आणि बसचा भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, २० जण जखमी)
सन – २०२३-२४ च्या पुरस्कारासाठी आदर्श शिक्षकांची निवड करण्यासाठी महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित शाळा व विनाअनुदानित शाळांतील एकूण १५८ शिक्षकांच्या मुलाखती घेऊन त्यातून ५० आदर्श शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कारार्थींमध्ये २६ महिला शिक्षकांसह २४ पुरुष शिक्षकांचा समावेश आहे. तसेच पुरस्कारार्थींमध्ये मराठी माध्यमाचे १०, इंग्रजी माध्यमाचे ५, तसेच हिंदी आणि उर्दू माध्यमाचे प्रत्येकी ६, गुजराथी भाषा एक, दाक्षिणात्य भाषा एक, विशेष शिक्षक ४, विशेष मुलांची शाळेतील एक शिक्षक, महानगरपालिका माध्यमिक शाळा ४, मान्यताप्राप्त खासगी अनुदानित व विनाअनुदानित १२ असे एकूण ५० शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. (Adarsh Teacher Mayor Award)
(हेही वाचा – आसाममध्ये Muslim विकत असलेल्या मासळीमुळे वाढतात किडनीचे आजार; मुख्यमंत्री सरमा यांनी दिली धक्कादायक माहिती)
पुरस्काराचे स्वरुप
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित शाळा व विना अनुदानित प्राथमिक शाळांतील ५० शिक्षकांना प्रत्येकी रुपये ११ हजार (ECS द्वारे), बृहन्मुंबई महानगरपालिका मानचिन्हाचे सोन्याचा मुलामा दिलेले पदक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व फेटा प्रदान करुन सन्मानित केले जाणार आहे. (Adarsh Teacher Mayor Award)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community