बदलापूर रेल्वे स्थानकात (Badlapur Railway Station) गोळीबाराची घटना घडली आहे. रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. एका इसमानं दोघांवर गोळीबार (Firing at Badlapur Railway Station) केल्याची प्राथमिक माहिती आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्राथमिक माहिती घेतली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. (Badlapur Firing)
बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबाराची घटना घडली आहे. संबंधित घटना ही संध्याकाळी सहा वाजता घडली आहे. विशेष म्हणजे संध्याकाळची वेळ ही अतियश गर्दीची वेळ असते. भर गर्दीत अशाप्रकारे गोळीबाराची घटना घडल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे.#badlapur #railwaystation #gunshoot #firing pic.twitter.com/BQkJjd0LzD
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) September 5, 2024
(हेही वाचा – आसाममध्ये Muslim विकत असलेल्या मासळीमुळे वाढतात किडनीचे आजार; मुख्यमंत्री सरमा यांनी दिली धक्कादायक माहिती)
स्टेशन मास्तरांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास नाना पगारे (Vikas nana Pagare) असे अटक करण्यात आलेल्या हल्लेखोराचे नाव आहे. या घटनेत एकूण चार होते. त्यांच्यात आधी बाजारपेठेत आणि त्यानंतर रेल्वे स्थानकावर वाद झाला. त्यातील एकानं दोघांवर तीन राऊंड फायर केले. त्यात एकाच्या पायाला गोळी चाटून गेली. ज्याला गोळी लागली तो त्याच्या सहकाऱ्यासोबत उपचारासाठी पळून गेला. गोळीबार करणाऱ्याला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आता सिटी पोलीस आणि रेल्वे पोलीस त्याचा जबाब नोंदवत आहेत. (Badlapur Firing)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community