उत्तर काश्मीरच्या (Kashmir) बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ खोऱ्यातील निर्वासित (रेफ्युजी) 1 आणि निर्वासित (रेफ्युजी) 2 च्या गावांमध्ये स्वातंत्र्यानंतर 1947 सालानंतर प्रथमच विजेचा दिवा पेटला. पुण्यातील एनजीओ असीम फाऊंडेशनच्या प्रयत्नामुळे ही ऐतिहासिक घटना घडली. वोक्सवॅगन ग्रुप टेक्नॉलॉजी या कंपनीने या उपक्रमासाठी अर्थसहाय्य केले.
असीम फाउंडेशनच्या प्रयत्नामुळे निर्वासित 1 आणि निर्वासित 2 मधील नागरिकांमध्ये आनंद आणि उत्साह वाढला होता, हे गाव पहिल्यांदाच प्रकाशने उजळले आहे. यामुळे गावातील महिलांमध्ये विशेष उत्साह होता. त्यांनी आपल्या खास पद्धतीने हा क्षण साजरा केला. असीम फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सारंग गोसावी म्हणाले की, नवीन सोलर ग्रीड्स प्रत्येक गावाला 2KW इतका वीज पुरवठा करते. शाश्वत ऊर्जेच्या वापराला चालना देण्यासाठी समान वितरण आणि किफायतशीररित्या सुनिश्चित करण्यासाठी या प्रकल्पात नाविन्यपूर्ण पॉवर लिमिटरचाही समावेश आहे, असेही ते म्हणाले. (Kashmir)
(हेही वाचा आसाममध्ये Muslim विकत असलेल्या मासळीमुळे वाढतात किडनीचे आजार; मुख्यमंत्री सरमा यांनी दिली धक्कादायक माहिती)
असीम फाऊंडेशनने यापूर्वी गागर हिल, जाबरी आणि सुमवली यासारख्या दुर्गम गावांमध्ये अशाच प्रकारचे सौर ग्रीड प्रकल्प राबवले आहेत, डॉ. गोसावी म्हणाले की, संघटना 2002 पासून या प्रदेशात कार्यरत आहे, सीमावर्ती समुदायांच्या विकासावर आणि सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करते. काश्मीरसारख्या (Kashmir) संवेदनशील भागात विद्युत सुविधा उपलब्ध करून असीम फाउंडेशनकडून काश्मीरमधील जनतेला मोठा दिलासा दिला आहे. असीम फाउंडेशनच्या या प्रयत्नामुळे रेफुजी १ आणि रेफ्युजी २ या ठिकाणच्या नागरिकांना त्यांच्या प्रगतीसाठी मोठा हातभार लागणार आहे.
Join Our WhatsApp Community