Times Tower Fire : मुंबईतील टाईम्स टॉवरला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु

114
Times Tower Fire : मुंबईतील टाईम्स टॉवरला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु
Times Tower Fire : मुंबईतील टाईम्स टॉवरला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु

मुंबईतील लोअर परेल परिसरातील कमला मिल्स कंपाऊडमध्ये टाइम्स टॉवर या व्यावसायिक इमारतीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलासोबतच इतर सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. लेव्हल टू तीव्रतेची ही आग आहे, असे सांगितले जात आहे. (Times Tower Fire)

(हेही वाचा – ‘भारत आवडत नसेल तर निघून जा’ ANIसंबंधी चुकीची माहिती दिल्या प्रकरणी हायकोर्टाने Wikipedia ला फटकारलं)

टाइम्स टॉवर ही कमला मिलमधील सात माळ्याची बिल्डिंग आहे. हे कमर्शियल टॉवर आहे. यात अनेक मोठ्या कंपन्यांची कार्यालये आहेत. सकाळी साडेसहा वाजता ही आग लागली असून अग्निशमन दलासोबत इतर सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

या आगीचा व्हिडिओही समोर आला आहे. यात ही आग किती भीषण आहे. याचा अंदाज येत आहे. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. (Times Tower Fire)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.