-
ऋजुता लुकतुके
भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात महाग ई-एसयुव्ही असलेली मर्सिडिझ बेंझ मेबॅक ईक्यूएस ६८० (Mercedes-Benz Maybach EQS 680) ही गाडी नुकतीच भारतात लाँच झाली आहे. पूर्णपणे इलेक्ट्रिक असलेली ही गाडी जगभरात चांगलं नाव कमवून आहे. पण, कंपनीने एक वर्ष उशिरा ही गाडी भारतात लाँच केली आहे. मेबॅक टॅग लावणारी ही मर्सिडिझची पहिली वहिली एसयुव्ही गाडी आहे. आणि लोटस एलिट्रा नंतरची ही सगळ्यात महागडी एसयुव्ही आहे. तिची किंमत आहे २.२५ कोटी रुपये.
मर्सिडिझच्या इतर इक्यूएस गाड्यांच्या तुलनेत ही मेबॅक असल्यामुळे डिझाईन पूर्णपणे वेगळं आणि मर्सि़डिझच्या तुलनेतही श्रीमंती आहे. गाडीतील फिचर्स अर्थातच श्रीमंती आणि मेबॅकचं उच्च दर्जाचं ब्रँडिंग असलेले आहेत. गाडीत डॅशबोर्डला तीन डिस्प्ले आहेत. यातला एक मेबॅक स्टार्टअपचा नियमित डिस्प्ले आहे. तर मागे बसणाऱ्या सहप्रवाशांसाठीही ११.५ इंचांचा इन्फोटेनमेंट डिस्प्ले देण्यात आला आहे. तर मागच्या प्रवाशांसाठी असलेला एमबक्स टॅबलेट हा गाडीच्या बाहेरही वापरता येऊ शकेल असा आहे. (Mercedes-Benz Maybach EQS 680)
(हेही वाचा – Ajit Pawar : “अजित पवारांचा संघाविषयीचा निर्णय : युतीमध्ये वाढणाऱ्या तणावाचा संकेत?”)
Yet another electric car from Mercedes-Benz in India and this time around, its the EQS 680. Powered by two electric motors, this one makes 658 bhp of power and 950 Nm of peak torque.
Watch the full video to learn more about India’s most expensive electric SUV-… pic.twitter.com/RRHBL3G0gV— 91Wheels.com (@91wheels) September 5, 2024
(हेही वाचा – OBC Caste Certificate : व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ओबीसी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्याची मुदत)
मेबॅक ईक्यूएस एसयुव्हीमध्ये एक खास शोफर पॅकेज देण्यात आलं आहे. ते घेतलं तर गाडीचे मालक मागे बसणार असं गृहित धरून डिझाईनमध्ये काही फेरफार करण्याची सोय आहे. म्हणजे मागची जागा तसंच बूट स्पेसही मग वाढवली जाईल. चालक आणि सहचालकासाठी एरवी असलेल्या सुविधा मागे बसणाऱ्या प्रवाशांसाठी देण्यात येतील. आणि मागे दोन फोल्डिंग टेबल ठेवण्याचीही सोय करून दिली जाईल. (Mercedes-Benz Maybach EQS 680)
गाडीतील डिस्प्लेना एचडीएमआय पोर्टची सोयही आहे. त्यामुळे मोबाईल किंवा संगणकातून एखादा व्हिडिओ किंवा कार्यक्रम तुम्ही कारमधील स्क्रीनवर पाहू शकाल. तर आयफोन तसंच सी पोर्ट हे मोबाईल चार्जिंग पॉइंटही यात देण्यात आले आहेत. गाडीतील इंजिनाबद्दल बोलायचं झालं तर दुहेरी इलेक्ट्रिक मोटार आहे. आणि दोन्ही मिळून ६५८ अश्वशक्ती इतकी ताकद ही मोटार निर्माण करू शकेल. शून्य ते १०० किमी प्रतीतासाचा वेग गाठण्यासाठी गाडीला फक्त ४.४ सेकंद लागतात. आणि एकदा बॅटरी चार्ज केली की, ६११ किलोमीटरचा पल्ला ही गाडी गाठू शकेल. (Mercedes-Benz Maybach EQS 680)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community