Mumbai-Goa Highway वर वाहतूक कोंडी; गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारे नोकरदार खोळंबले

133
Mumbai-Goa Highway वर वाहतूक कोंडी; गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारे नोकरदार खोळंबले
Mumbai-Goa Highway वर वाहतूक कोंडी; गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारे नोकरदार खोळंबले

कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी मुंबईतील नोकरदार लाखोंच्या संख्येने कोकणात दाखल होत असतात. यंदाही गणेशोत्सव सणासाठी काही तास शिल्लक असल्यानं मुंबईतील कोकणी कुटुंबे एसटी बस, खासगी वाहनं आणि चारचाकी गाड्यांपासून दुचाकीपर्यंत शक्य त्या सर्व वाहनांचा वापर करत कोकणात निघाली आहेत. त्यांना वाहतूक कोंडीचा (Traffic congestion) फटका बसत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. (Mumbai-Goa Highway)

(हेही वाचा – ias officer salary : IAS अधिकार्‍यांबद्दल आपल्या मनात आदर असतो! ह्यांना पगार किती मिळतो माहितीय का?)

मंगळवारपासूनच कोकणाच्या दिशेने जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आणि गुरुवारी रात्रीपासून हा ओघ आणखी वाढला. अनेक वाहने रस्त्यावर उतरल्यामुळे कासवगतीने वाहने पुढे सरकरत आहेत. त्यामुळे वाहनधारकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे, सुकेळी खिंड, लोणेरे परिसरात अधिक प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. आज सकाळपासून महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसमोर विघ्नच विघ्न येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच, मुंबई-गोवा महामार्गावर रिमझिम पावसाच्या सरी कोसळत असल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहने सावकाश चालवण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. (Mumbai-Goa Highway)

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरही वाहनांच्या रांगा

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर देखील मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेनं येणाऱ्या लेनवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. गणेशोत्सवासाठी मुंबई आणि आसपासच्या परिसरातून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत आहे. बोरघाट पोलीस वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबईहून येणाऱ्या आणि पुण्याहून जाणाऱ्या दोनही लेनवरून वाहतूक सुरू करून कोंडी फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. (Mumbai-Goa Highway)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.