BJP ची गरज संपली; एकनाथ खडसेंना आता मुलीसाठी पुन्हा NCP ची गरज

138
BJP ची गरज संपली; एकनाथ खडसेंना आता मुलीसाठी पुन्हा NCP ची गरज

माजी मंत्री, विधान परिषद आमदार एकनाथ खडसे यांनी सून रक्षा खडसे यांना भाजपाच्या (BJP) तिकिटावर लोकसभा निवडणुकीत निवडून आणण्यासाठी भाजपाचे काम केले आता त्यांना त्यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांना विधानसभेत निवडून आणण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत काम करणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून एकनाथ खडसे यांनी भाजपावर टीका करत पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाण्याचे निश्चित केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

पहिली बातमी ‘हिंदुस्थान पोस्ट’ची

‘एकनाथ खडसे भाजपा (BJP) की राष्ट्रवादी शरद पवार’ अशा द्विधा मनस्थितीत असल्याची बातमी सगळ्यात आधी ‘हिंदुस्थान पोस्ट’ने दोन महिन्यापूर्वी ८ जुलै २०२४ ला दिली होती. गेल्या दोन दिवसांपासून खडसे स्वतः मान्य करत आहेत की ते द्विधा मनस्थितीत होते. “मी संभ्रमावस्थेत आहे हे तर माहीत आहे, मी कन्फ्युज आहे, हे मी सांगितले आहे.

(हेही वाचा – तीन महिने उलटूनही भाजपा प्रवेश न झाल्याने Eknath Khadse द्विधा मनस्थितीत?)

सर्वोच्च नेत्याच्या आमंत्रणवरून भाजपात

“मी स्वतः भाजपात (BJP) गेलो नव्हतो तर भाजपाच्या दिल्लीतील सर्वोच्च नेत्याच्या आमंत्रणवरून भाजपात आलो. भाजपाने मला पक्षप्रवेश देऊनही जाहीर केले नाही. त्यामुळे भाजपाला माझी आवश्यकता नाही, असे वाटते. मी काही अडचणींमुळे भाजपात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आणि त्या अडचणी अजून कायम आहेत. आता वाटते जर भाजपाला गरज नाही तर माझा मूळ पक्ष काय वाईट? मी त्यांचा आमदार आहे अजून आणि चार वर्षे राहणार आहे,” असे सांगतानाच ‘मी राष्ट्रवादीत आहे, पक्ष सोडलेला नाही,” असेही खडसे यांनी सांगितले.

(हेही वाचा – Ajit Pawar : “अजित पवारांचा संघाविषयीचा निर्णय : युतीमध्ये वाढणाऱ्या तणावाचा संकेत?”)

फडणवीस-महाजन हे नड्डा यांच्यापेक्षा मोठे

“भाजपात (BJP) माझा प्रवेश पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या हस्ते झाला आहे आणि त्यांनी ते सांगायला हवं आहे. पण देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन हे जर त्याला विरोध करत असतील तर फडणवीस आणि महाजन हे नड्डा यांच्यापेक्षा मोठे नेते असावेत,” असेही खडसे म्हणाले.

घरातच दोन आमदार, केंद्रीय मंत्री

मात्र भाजपात (BJP) यावरून उलटसुलट चर्चा होत आहे. खडसे स्वतः आमदार आहेत. त्यांची सून रक्षा खडसे केंद्रीय मंत्री आणि मुलगी रोहिणी यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून तिकीट मिळणार, हे नक्की. त्यामुळे आता एकच घरात दोन आमदार आणि एक केंद्रीय मंत्री, अशी स्वप्ने खडसे यांना पडत असावीत, असे बोलले जात आहे. त्यामुळेच रक्षा खडसे निवडून आल्या, मंत्री झाल्या, आता भाजपाची गरज संपली आणि राष्ट्रवादीची गरज आहे. त्यामुळे रोहिणी यांना विधानसभेत पाठवण्यासाठी खडसे यांनी शरद पवार यांच्याकडे परत जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.