देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात; Devendra Fadnvis यांची माहिती

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या X वर पोस्ट केली आहे. त्यामध्ये फडणवीस यांनी महाराष्ट्राचे अभिनंदन केले.

136
‘गेले दोन वर्षे सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1 वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे’, अशी माहिती अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या X वर पोस्ट केली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे अभिनंदन केले.

कोणते राज्य कोणत्या क्रमांकावर? 

या पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी परकीय गुंतवणुकीत पहिल्या 9 राज्यांची यादी दिली. यात कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर तर राजस्थान 9 व्या क्रमांकावर आहे.
  • दुसर्‍या क्रमांकावरील कर्नाटक (19,059 कोटी)
  • तिसर्‍या क्रमांकावरील दिल्ली (10,788 कोटी)
  • चौथ्या क्रमांकावरील तेलंगणा (9023 कोटी)
  • पाचव्या क्रमांकावरील गुजरात (8508 कोटी)
  • सहाव्या क्रमांकावरील तामिळनाडू (8325 कोटी)
  • सातव्या क्रमांकावरील हरयाणा (5818 कोटी)
  • आठव्या क्रमांकावरील उत्तरप्रदेश (370 कोटी)
  • नवव्या क्रमांकावरील राजस्थान (311 कोटी)

(हेही वाचा Western Railway : विरारकरांची गर्दीपासून होणार सुटका; बोरिवली ते विरार पाचव्या अन् सहाव्या मार्गिकेतील अडसर दूर)

या सर्वांच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. थोडक्यात सांगायचे तर या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही 1,34,959 कोटी रुपये इतकी असून, त्यापैकी 70,795 कोटी अर्थात 52.46 टक्के एकट्या महाराष्ट्रात आली आहे. यापूर्वी 2022-23 : 1,18,422 कोटी (कर्नाटक, दिल्ली, गुजरात यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक) 2023-24 : 1,25,101 कोटी (गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात+कर्नाटक यांच्या बेरजेहून अधिक)

राज्यात 2014 ते 2019 या काळात सत्तेत असताना एकूण 3,62,161 कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती. अडीच वर्षांत आम्ही 5 वर्षांचे काम करुन दाखवू, हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितले होते. आता सव्वा दोन वर्षांत 3,14,318 कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणून दाखविली, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.