global hospital mumbai : ग्लोबल हॉस्पिटल हे कोणच्या मालकीचं आहे?

109
global hospital mumbai : ग्लोबल हॉस्पिटल हे कोणच्या मालकीचं आहे?

ग्लोबल हॉस्पिटल (global hospital mumbai) हे भारतातलं एक हॉस्पिटल नेटवर्क आहे.

ग्लोबल हॉस्पिटलचा इतिहास

ग्लोबल हॉस्पिटल्सच्या ग्रुपची स्थापना डॉ. के. रवींद्रनाथ यांनी १९९९ साली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून केली होती. या हॉस्पिटलमध्ये भारतातलं पहिलं यशस्वी स्प्लिट, यकृत प्रत्यारोपण आणि पहिल्यांदाच एकाच वेळी हृदय व मूत्रपिंड प्रत्यारोपण केलं गेलं आहे.

ऑगस्ट २०१५ साली IHH हेल्थकेअरने हैदराबाद आधारित GE मेडिकल असोसिएट्स प्रायव्हेट लिमिटेडमधल्या रु. १,२८९ कोटी रुपयांना ग्लोबल हॉस्पिटल्स या ब्रँडच्या अंतर्गत हॉस्पिटल्सना ७३.४% स्टेकची घोषणा केली. IHH हेल्थकेअर बरहॅड ने ग्लेनिगल्स या ब्रँड अंतर्गत ग्लोबल हॉस्पिटल्सचं पुनर्ब्रँडिंग केलं. त्यामुळे त्यांचा भारतातला पाया मजबूत झाला.

(हेही वाचा – देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात; Devendra Fadnvis यांची माहिती)

ग्लोबल हॉस्पिटल्सचा भविष्यातील विस्तार

मार्च २०१७ साली ग्लेनिगल्स ग्लोबल हॉस्पिटल्सनी मार्केटमध्ये आपलं स्थान वाढवण्यासाठी रु. २०० कोटीची गुंतवणूक करण्याची योजना जाहीर केली. त्या योजनेमध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये असलेल्या बेडची संख्या १,४०० वरून २,१०० पर्यंत वाढवणं आणि दिल्लीमध्ये एक नवीन शाखा उघडणं या गोष्टींचा समावेश होता. (global hospital mumbai)

ग्लोबल हॉस्पिटल्सच्या भारतातल्या उलाढाली खालील कार्यकारणी सदस्य पाहतात.
  • मुख्य नेतृत्व – डॉ. के. रवींद्रनाथ (अध्यक्ष),
  • ग्लेनेगल्स ग्लोबल हॉस्पिटल्स, भारत विभाग – रमेश कृष्णन (मुख्य कार्यकारी अधिकारी)
  • भारत संचालन विभाग – पार्कवे पंताई लिमिटेड

एप्रिल २०१८ साली पार्कवे पंताईने त्यांच्या भारत ऑपरेशन विभागासाठी
मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ. अजय बक्षी यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

(हेही वाचा – Devendra Fadnavis यांनी शिवरायांनी सुरत लुटली नसल्याच्या वक्तव्याचा केला खुलासा; म्हणाले…)

  • ग्लोबल हॉस्पिटल्स चेनमधली रुग्णालये
  • अवेअर ग्लेनिगल्स ग्लोबल हॉस्पिटल्स, एलबी नगर, हैदराबाद
  • ग्लेनिगल्स ग्लोबल हॉस्पिटल्स, लकडी-का-पुल, हैदराबाद
  • ग्लेनिगल्स ग्लोबल हेल्थ सिटी, पेरुम्बक्कम, चेन्नई
  • ग्लेनिगल्स ग्लोबल क्लिनिक्स, अड्यार, चेन्नई
  • BGS ग्लेनिगल्स ग्लोबल हॉस्पिटल्स, केंगेरी, बंगळुरू
  • ग्लेनिगल्स ग्लोबल हॉस्पिटल्स, रिचमंड रोड, बंगळुरू
  • ग्लोबल हॉस्पिटल्स, परळ, मुंबई (global hospital mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.