Shiv Sena UBT ची २२ उमेदवारांची ‘पुडी’ काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी; उबाठाचे दबावतंत्र

172
Shiv Sena UBT ची २२ उमेदवारांची ‘पुडी’ काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी; उबाठाचे दबावतंत्र

शिवसेना उबाठाने (Shiv Sena UBT) मुंबईतील ३६ पैकी २२ जागांवर आपला दावा सांगत संभाव्य उमेदवारांची यादी माध्यमांमध्ये सोडली आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्यावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.

(हेही वाचा – BJP ची गरज संपली; एकनाथ खडसेंना आता मुलीसाठी पुन्हा NCP ची गरज)

रस्सीखेच निश्चित

विशेष म्हणजे, उद्या शनिवारी ७ सप्टेंबरला महाविकास आघाडीची जागावाटपाची बोलणी सुरू होणार असून उबाठाने याआधीच उमेदवारांच्या यादीची ही ‘पुडी’ माध्यमांमध्ये सोडल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आश्चर्य व्यक्त होत आहे. मुंबईत विधानसभेच्या ३६ जागा असून त्यातील १६-१७ जागांवर काँग्रेसने दावा केला आहे तर राष्ट्रवादीने (शप) मुंबईत आपली ताकद नसतानाही ७-८ जागांची मागणी केली आहे. तसेच उबाठाने (Shiv Sena UBT) २२ जागांवर दावा केल्याने ३६ जागांसाठी महाविकास आघाडीत प्रचंड रस्सीखेच होणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

(हेही वाचा – Devendra Fadnavis यांनी शिवरायांनी सुरत लुटली नसल्याच्या वक्तव्याचा केला खुलासा; म्हणाले…)

मुंबईवरील वर्चस्व

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतून शिवसेनेचे १४ उमेदवार निवडून गेले तर भाजपाचे १६. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वाट्याला राज्यात सर्वाधिक १३ अधिक एक अपक्ष अशा १४ जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसचा (शप) स्ट्राइक रेट सगळ्यात चांगला होता. हे गणित लक्षात घेऊन महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आत्मविश्वास बळावला असल्याने मुंबईत या पक्षांना आपली ताकद वाढवण्याची महत्वाकांक्षा निर्माण झाली असल्याचे दिसते. तर दुसरीकडे शिवसेना उबाठाचा (Shiv Sena UBT) जीव मुंबईत अडकल्याने मुंबईवरील वर्चस्व कायम ठेवण्यावर ठाकरे यांच्या उबाठाचा भर आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.