Ganeshotsav 2024 : मुंबई पोलिसांना गणेशोत्सव काळात सतर्क राहण्याचे आदेश

122
  • प्रतिनिधी

दहशतवाद्यांच्या नेहमी निशाण्यावर असणाऱ्या मुंबई शहराला ऐन गणेशोत्सवामध्ये (Ganeshotsav 2024) कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तोंडावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुका त्यात उत्सवाचे दिवस असल्यामुळे समाज कंटकाकडून मुंबईत घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याचा इशारा वरिष्ठ अधिकाऱ्यां कडून देण्यात आला आहे.

मुंबईसह राज्यात उद्यापासून १० दिवस गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2024) धूम असणारा आहे. या दरम्यान दहशतवादी संघटनाकडून मुंबईत घातपात करण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे मुंबई पोलीस दलाला सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांसह दहशतवाद विरोधी पथकला (एटीएस) देखील या दरम्यान सतर्क राहण्यासाठी सांगण्यात आले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्तलयात नुकत्याच पार पडलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत पोलीस दलाला सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

(हेही वाचा – Shiv Sena UBT ची २२ उमेदवारांची ‘पुडी’ काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी; उबाठाचे दबावतंत्र)

गणेश मंडळांना देखील सतर्कतेचा इशारा

मुंबईतील लॉज, हॉटेल मुशाफिरखान्याची तपासणी करून संशयितांची चौकशी करण्याचे तसेच स्लम पट्ट्यात खबऱ्यांचे जाळे तयार करून त्या ठिकाणी सुरू असणाऱ्या गैरकारभाराविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार यंदाच्या गणेशोत्सवात (Ganeshotsav 2024) दहशतवादी संघटनांची घातपात करण्याची शक्यता असून गणेश मंडळांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून प्रत्येक गणेश मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्याच्यावर निगराणी ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

मुंबईतील मोठी गणेश मंडळे तसेच गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवून साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढविण्यात येणार आहेत. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मंडळाच्या आवारात काहीही संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती आढळून आल्यास पोलिसांना सतर्क करण्यात यावे अशी सूचना मंडळांना देण्यात आलेल्या आहेत. गणेशोत्सवाच्या काळात मोबाईल चोरी, सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळ्या राज्यांच्या बाहेरून मुंबईत दाखल होतात, या टोळ्यांवर लक्ष ठेवून कारवाई करण्यात यावी, त्याच बरोबर महिलांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात यावी, यासाठी निर्भया पथकाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. (Ganeshotsav 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.