सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
श्री गणेशोत्सवात पूजन करण्यासाठी बाजारातील आकर्षक मूर्तींच्या मोहात न अडकता अथर्वशीर्षात केलेल्या वर्णनानुसारच गणेशमूर्ती घ्या ! ‘श्री गणपती अथर्वशीर्षा’त (Shri Ganapati in Atharvashirsha) गणेशाच्या रूपाचे वर्णन केले आहे. ‘एकदन्तं चतुर्हस्तं…।’ म्हणजे ‘एकदंत, चतुर्भूज, पाश आणि अंकुश धारण करणारा, एका हाती (मोडलेला) दात धारण करणारा आणि दुसऱ्या हाताची वरदमुद्रा असलेला, ज्याचा ध्वज मूषकचिन्हांकित आहे, असा रक्त (लाल) वर्ण, लंबोदर, सुपासारखे कान असलेला, रक्त (लाल) वस्त्र नेसलेला, अंगाला रक्तचंदनाचा अनुलेप लावलेला आणि रक्त (लाल) पुष्पांनी पूजन केलेला असावा, असे अथर्वशीर्षात म्हटले आहे.’ ( Atharvashirsha)
श्री गणेश हा एका हाती (मोडलेला) दात धारण करणारा आहे, असे अथर्वशीर्षात सांगितले आहे. श्री गणेश ही मुख्यत्वे ज्ञानाची (विद्येची) देवता आहे. ‘मोदक’ हे ज्ञानाचे प्रतीक आहे. या कारणामुळे श्री गणेशाच्या हातात मोडलेल्या दाताच्या स्थानी मोदक दाखवण्याची पद्धत पडली असावी, असे म्हणतात. (Atharvashirsha)
(हेही वाचा – Ganesh Utsav 2024 : गणेशोत्सवातील पावित्र्य आणि धर्मजागृतीसाठी शंभराहून अधिक गणेश मंडळ आली एकत्र)
श्री गणेशाच्या मूर्तीची उंची अधिकाधिक एक फूट ते दीड फूट असावी. श्री गणेश चतुर्थीच्या काळात ज्या मूर्तीची पूजा केली जाते, ती मूर्ती चिकणमाती किंवा शाडूची माती यांपासून बनवावी, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. अन्य वस्तूंपासून (उदा. प्लास्टर ऑफ पॅरिस, कागदाचा लगदा) मूर्ती बनवणे, हे धर्मशास्त्रविरोधी, तसेच पर्यावरणाला घातक आहे! ( Atharvashirsha)
वेगवेगळ्या रूपांतील गणेशमूर्ती घ्यावी का?
श्री गणेशाची विविध रूपे आहेत; परंतु त्यामुळे ‘श्री गणेशाला आपण हव्या त्या रूपात दाखवू शकतो’, असा त्याचा अर्थ होत नाही. बहुतांश चित्रकार, शिल्पकार आदी कलाकारांना ‘श्री गणेश विविध रूपांमध्ये दाखवता येतो’; म्हणून तो अधिक आवडतो. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे त्यांना हे ज्ञात नसते की, स्वतःच्या मनाला हवे तसे वेडेवाकडे श्री गणेशाचे रूप रेखाटल्याने त्यांच्याकडून श्री गणेशाचा अवमान होतो आणि ‘कर्मफलन्याय’ या सिद्धांताप्रमाणे त्या कृतीमुळे त्यांना पाप लागते. जसे स्वत:च्या आई-वडिलांचा अवमान केलेला किंवा त्यांचे चित्र-विचित्र चित्र काढलेले कुणाला आवडणार नाही, तसेच माता-पित्यांपेक्षाही श्रेष्ठ असणाऱ्या देवतांचे ‘कार्टुन’ किंवा अन्य चित्र-विचित्र पोशाखातील चित्र, प्रतिमा, आकृती, शिल्प किंवा मूर्ती निर्माण करणे, हे अयोग्य आहे. (Atharvashirsha)
(लेखक सनातन संस्थेचे संस्थापक आहेत.)
हेही पाहा –