- ऋजुता लुकतुके
नुकत्याच आटोपलेल्या श्रीलंका दौऱ्यापासून भारतीय क्रिकेटमध्ये गौतम गंभीर यांची प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ सुरू झाला आहे. आता भारतीय संघ बांगलादेश, न्यूझीलंड विरुद्धच्या देशांतर्गत कसोटी मालिका आणि त्यानंतरच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. १४ सप्टेंबरपासून भारतीय संघाचं शिबिरही चेन्नईत सुरू होईल. आणि पुढील हंगामात गौतम गंभीरसमोरचं खरं आव्हान सुरू होईल. कारण, चॅम्पियन्स करंडक आणि कसोटी अजिंक्यपद स्पर्धा हे भारतासमोरील पुढील लक्ष्य आहे. (Rishabh Pant on Gambhir)
(हेही वाचा – गाझावरील आक्रमणाचा निषेध करणार्या Greta Thunberg ला अटक)
अशावेळी गौतम गंभीरच्या ड्रेसिंग रुममध्ये असण्याने नेमका काय बदल झाला आहे यावर स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने भाष्य केलं आहे. दोघंही रणजी स्पर्धेत दिल्ली या एकाच संघाकडून खेळतात. जिओ सिनेमावरील एका मुलाखतीत रिषभ पंत म्हणतो, ‘राहुल भाई अगदी संतुलित व्यक्तिमत्त्व होतं. त्यातून सकारात्मक विचार शोधायचे की, नकारात्मक हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं.’ (Rishabh Pant on Gambhir)
(हेही वाचा – Ganesh Utsav 2024 : गणेशोत्सवातील पावित्र्य आणि धर्मजागृतीसाठी शंभराहून अधिक गणेश मंडळ आली एकत्र)
पुढे गौतम गंभीरविषयी बोलताना रिषभ पंत म्हणतो, ‘गौती भाई हा जास्त आक्रमक आहे. तो फक्त विजयाबद्दलच बोलतो. संघात योग्य समतोल साधणं हे महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येकात सुधारणा झाली पाहिजे.’ आगामी बांगलादेश मालिकेचं महत्त्व पंतला कळतंय. त्यांनी अलीकडेच पाकिस्तानला त्यांच्याच मैदानात २-० ने हरवलंय. त्यामुळे त्यांना हलक्यात घेणं पंतला मान्य नाही. ‘पाकिस्तान, श्रींलंका आणि बांगलादेश सारखे संघ त्यांना पोषक असलेल्या वातावरणात आपला खेळ उंचवतात. त्यामुळे बांगलादेशला हलकं लेखून चालणार नाही. तशी चूक आम्ही करणार नाही. आम्ही या मालिकेत पूर्ण तयारीनिशी उतरू,’ असं पंत म्हणाला. भारत आणि बांगलादेश दरम्यानची कसोटी मालिका १९ सप्टेंबरपासून चेन्नई कसोटीने सुरू होत आहे. तर मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना २७ तारखेला कानपूरला सुरू होईल. (Rishabh Pant on Gambhir)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community