वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी Pooja Khedkar ला केंद्र सरकारचा धक्का; सेवेतून बडतर्फ!

206
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी Pooja Khedkar ला केंद्र सरकारचा धक्का; सेवेतून बडतर्फ!
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी Pooja Khedkar ला केंद्र सरकारचा धक्का; सेवेतून बडतर्फ!

वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकरवर केंद्र सरकारने कठोर कारवाई करून मोठा दणका दिला. पूजा खेडकर यांना सरकारी सेवेमधून बरखास्त करण्यात आले आहे. या प्रकरणाची कोर्टात केसही सुरू आहे. पूजा खेडकरने शुक्रवारी एम्समध्ये तिच्या अपंगत्वाची तपासणी करण्यास तयार असल्याचे सांगितले होते. पूजाने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण केंद्र सरकारने सर्व प्रकरणाची दखल घेऊन तिची सेवाच समाप्त करून टाकली. (Pooja Khedkar)

पूजा खेडकर (Pooja Khedkar) हिचे नाव, तिच्या पालकांचे नाव, सही, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक आणि पत्ता बदलून आपली ओळख खोटी करून परीक्षेला बसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर पूजा खेडकर तिच्या अधिकारांचा गैरवापर करून CSE (Civil Services Examination) 2022 च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर पूजा खेडकरची सेवा समाप्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. पूजा खेडकर यांनी दोन ओळखपत्रांवर दोन वेगवेगळे पत्ते दिले. त्यांना आधारकार्डवर पुण्यातील नॅशनल हौसिंग सोसायटी औंध पुणे येथील पत्ता दिला, तर रेशनकार्डवर आळंदी- देहू रस्ता तळवडे येथील कंपनीचा पत्ता दिला होता.

(हेही वाचा – Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवात PMP च्या ८०० जादा बस धावणार)

पूजा खेडकर 2020-21 मध्ये OBC कोट्यातील परीक्षेत ‘पूजा दिलीपराव खेडकर’ या नावाने बसली होती. 2021-22 मध्ये सर्व प्रयत्न पूर्ण केल्यानंतर, पूजा OBC आणि PWBD (अपंग व्यक्ती) कोट्याअंतर्गत परीक्षेला बसली. तेव्हा ‘पूजा मनोरमा दिलीप खेडकर’ हे नाव वापरले होते. यूपीएससीने पूजा खेडकर विरोधात फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी खटला सुरू केला. यानंतर पूजा खेडकरने आपली उमेदवारी रद्द करण्याच्या यूपीएससीच्या निर्णयाला आव्हान देत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. कोर्टासमोर दिलेल्या उत्तरात पूजाने दावा केला की तिने युपीएससीला तिच्या नावाने फेरफार करण्याचा अधिकार नाही. दरम्यानच्या काळात पूजा खेडकरची आई आणि तिचे वडील यांची ही वेगवेगळी गैरव्यवहार प्रकरणे बाहेर आली. त्याची माध्यमांमध्ये मोठी चर्चा झाली होती.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.