भविष्यात मुंबईसह किनारी भागांना धोका, संशोधनासाठी नासाचा खास Ice Node Robot प्रकल्प; जाणून घ्या

176
भविष्यात मुंबईसह किनारी भागांना धोका, संशोधनासाठी नासाचा खास Ice Node Robot प्रकल्प; जाणून घ्या
भविष्यात मुंबईसह किनारी भागांना धोका, संशोधनासाठी नासाचा खास Ice Node Robot प्रकल्प; जाणून घ्या

येत्या 16 वर्षांत म्हणजे 2050 पर्यंत जगासह भारतातील अनेक देश, बेटे आणि किनारपट्टीवरील किमान 13 शहरे समुद्रात बुडतील, असा दावा शास्त्रज्ञांनी अनेकदा केला आहे. मुंबईचे 13 टक्के क्षेत्र म्हणजे 830 चौरस किलोमीटर समुद्रात बुडणार आहे. याच पार्श्वभूमीवर नासाच्या शास्त्रज्ञांनी समुद्राची वाढती पाण्याची पातळी मोजण्यासाठी खास रोबोट तयार केले आहेत. हे रोबोट पाण्याखाली पाठवले जात आहेत. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीने (NASA Jet Propulsion Laboratory) एक नवीन प्रकल्प सुरू केला आहे. त्याचे नाव ‘IceNode’ आहे. या मोहिमेत नासाचे शास्त्रज्ञ अंटार्क्टिकाच्या बर्फाळ थराखाली समुद्राखाली स्वायत्त पाण्याखालील रोबोट सोडत आहेत. ते समुद्राखालून अंटार्क्टिकाचा अभ्यास करतील. (Ice Node Robot)

भविष्यात ग्लोबल वॉर्मिंग आणि मानवाच्या समुद्रावरील अतिक्रमाणाचे भयानक परिणाम भोगावे लागणार आहेत. पुढील काही वर्षांत भारतातील मुंबई, कोची, मंगळुरू, चेन्नई, विशाखापट्टणम आणि तिरुवनंतपुरमसारख्या मोठ्या शहरांची किनारपट्टी अतिशय लहान होण्याचा धोका आहे. शतकाच्या अखेरीस जलमय झालेल्या क्षेत्राचे प्रमाण 1377.12 चौरस किलोमीटरपर्यंत वाढेल. 2150 पर्यंत मुंबई पाण्यात नाहीशी होईल. (Ice Node Robot)

यावर्षी मार्च महिन्यात नासाच्या शास्त्रज्ञांनी अलास्काच्या ब्युफोर्ट समुद्रात बर्फाच्या जाड पृष्ठभागापासून 100 फूट खाली सिलिंडरसारखा रोबोट तैनात केला होता. असे अनेक रोबोट अंटार्क्टिकामध्ये तैनात करण्याच्या तयारीत आहेत. हे सर्व रोबोट बराच काळ बर्फाच्या जाड थराखाली वितळणारा बर्फ आणि समुद्राच्या वाढत्या पातळीची माहिती गोळा करतील.

(हेही वाचा – काश्मिरमध्ये अशांतता असेपर्यंत पाकशी चर्चा नाही – केंद्रीय मंत्री Amit Shah)

अंटार्क्टिका हा असा खंड आहे जिथे फार कमी लोकांचा वावर आहे. या खंडाचं आरोग्य बिघडल्यास संपूर्ण जग हादरून जाईल. तेथीच ऋतू बदल संपूर्ण जगावर परिणाम करतात. त्यामुळे तिथे अशी उपकरणं बसवणं गरजेचं आहे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला भविष्यातील आपत्तींची सविस्तर माहिती मिळू शकेल. (Ice Node Robot)

शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, अंटार्क्टिकातील संपूर्ण बर्फ वितळला तर जगातील जवळपास सर्व समुद्रांची पाण्याची पातळी 200 फुटांनी वाढेल. अशावेळी भारतातील अनेक किनारी राज्यांचा मोठा भाग पाण्याखाली जाईल. जगाच्या नकाशावरून अनेक बेटं नाहीशी होतील. समुद्र पाहण्यासाठी आपल्याला मुंबई किंवा चेन्नईसारख्या ठिकाणी जावं लागणार नाही. समुद्राची पाणी पातळी वाढल्यास पुणे आणि बेंगळुरूसारख्या शहरांमध्येच समुद्र बघता येईल. जसजशी उष्णता वाढत आहे तसतसं ग्लोबल वार्मिंग वाढत आहे. हिमनद्या आणि अंटार्क्टिकातील बर्फ वेगाने वितळत आहेत.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.