CBI Action CGST : सीबीआयने मुंबईत लाचखोर सीजीएसटी अधीक्षकासह दोघांच्या मुसक्या आवळल्या; तक्रारदाराकडे 60 लाखांची मागणी

148
CBI Action CGST : सीबीआयने मुंबईत लाचखोर सीजीएसटी अधीक्षकासह दोघांच्या मुसक्या आवळल्या; तक्रारदाराकडे 30 लाखांची मागणी
CBI Action CGST : सीबीआयने मुंबईत लाचखोर सीजीएसटी अधीक्षकासह दोघांच्या मुसक्या आवळल्या; तक्रारदाराकडे 30 लाखांची मागणी

‘केंद्रीय वस्तू आणि सेवा कर’ (सीजीएसटी) विभागाच्या लाचखोर अधीक्षकासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन खाजगी व्यक्तीसह सीजीएसटी अधिकक्षाला अटक करण्यात आली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ‘सीजीएसटी’ लाचखोरी प्रकरणात मुंबईत (Mumbai Crime) केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. ३० लाख रुपयांच्या लाचखोरी प्रकरणात सीबीआयने सापळा रचून ६ लाख रुपयांचा पहिला हप्ता घेतांना मुंबई विभागाच्या सीजीएसटी अधिकक्षासह दोन (CGST Superintendent) खाजगी व्यक्तींना अटक केली आहे.

केंद्रीय वस्तू आणि सेवा कर’ मुंबई विभागातील ६ अधिकाऱ्या सह ८ जणांविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) कडे आलेल्या तक्रारी वरून सीबीआयने शनिवारी मुंबईत अतिरिक्त आयुक्त, एक सहआयुक्त, ४ अधीक्षक आणि सनदी लेखापालासह २ खाजगी व्यक्तींविरुद्ध लाचखोरीच्या आरोपांवर गुन्हा नोंदवला होता. या गुन्ह्यातील तक्रारदार व्यवसायिक असून ४ सप्टेंबर रोजी तक्रारदाराने सांताक्रूझ येथील सीजीएसटी विभागाच्या कार्यालयाला भेट दिली, त्यावेळी तक्रारदाराला १८ तास बेकायदेशीर कोंडून ठेवण्यात आले होते. या दरम्यान एका अधिकाऱ्याने तक्रारदार याला अटक न करण्यासाठी ८० लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ही रक्कम ६० लाख रुपयांवर करण्यात आली. (CBI Action CGST)

(हेही वाचा – काश्मिरमध्ये अशांतता असेपर्यंत पाकशी चर्चा नाही – केंद्रीय मंत्री Amit Shah)

तक्रारदाराने सीबीआयला (CBI) दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे, त्याला ती रक्कम देण्यासाठी इतर तीन अधिक्षकानी त्याच्यावर दबाव आणला होता. त्याला मारहाण करून शिवीगाळ करण्यात आली होती. तक्रारदार सीजीएसटी अधिकाऱ्यांच्या (CGST Superintendent) कैदेत असताना, त्याच्या चुलत भावाला कॉल करून त्याला सीजीएसटी कार्यालयात बोलवण्यात आले आणि तक्रारदाराला अटक न करण्यासाठी ६० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती, त्यातील ३० लाख रुपयांची रक्कम हवाला मार्फत स्वीकारण्यात आली. त्यानंतरच तक्रारदाराला दुसऱ्या दिवशी सीजीएसटी कार्यालयातून बाहेर पडू देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

दरम्यान उर्वरित ३० लाख रुपयांच्या लाचेचा ६ लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारतांना सीबीआयने दोन खाजगी व्यक्तीसह सीजीएसटी अधीक्षकाला ओशिवरा (Oshiwara CBI Red) येथे सापळा रचून अटक कऱण्यात आली आहे. सीबीआयने सापळा रचून लाच घेताना वरील सर्व तीन आरोपींना अटक केली. त्यांना मुंबईतील सीबीआय प्रकरणांसाठी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अटक केलेल्या अधीक्षक आणि लेखा परीक्षक यांना १० सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली. अटक करण्यात आलेल्या खासगी व्यक्तीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सीबीआयने अटक आणि गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सीजीएसटी अधीक्षकाच्या मुंबई आणि आजूबाजूच्या निवासस्थानासह ९ ठिकाणी झडती घेण्यात आली असून या झडतीमध्ये महत्वाचे कागदपत्रे जप्त करण्यात आली असून तपास सुरू आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.