Bajaj Housing Finance IPO : सोमवारी सुरू होणाऱ्या बजाज हाऊसिंग फायनान्स आयपीओ विषयी महत्त्वाची माहिती

Bajaj Housing Finance IPO : बजाज हाऊसिंग फायनान्स आयपीओच्या महत्त्वाच्या तारखा जाणून घेऊया.

127
Bajaj Housing Finance IPO : सोमवारी सुरू होणाऱ्या बजाज हाऊसिंग फायनान्स आयपीओ विषयी महत्त्वाची माहिती

९ सप्टेंबर म्हणजे सोमवारी ३ आयपीओ शेअर बाजारात येत आहेत. आयपीओ म्हणजे एखाद्या कंपनीचे शेअर पहिल्यांदा शेअर बाजारात सूचीबद्ध होणं. किरकोळ गुंतवणूकदारांना वाजवी दरात शेअर खरेदीची ही नामी संधी असते. सोमवारी जे ३ आयपीओ बाजारात येणार आहेत त्या कंपन्या आहेत – बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेड, क्रॉस लिमिटेड आणि टोलिन्स टायर्स लिमिटेड. ११ सप्टेंबरपर्यंत गुंतवणूकदार तिन्ही आयपीओसाठी बोली लावू शकतील. (Bajaj Housing Finance IPO)

१६ सप्टेंबर रोजी या तीन कंपन्यांचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज वर सूचिबद्ध होतील. यातील बजाज हाऊसिंग फायनान्स कंपनीच्या आयपीओविषयी आणि महत्त्वाच्या तारखांविषयी जाणून घेऊया,

बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनी या आयपीओ द्वारे एकूण ६५६० कोटी रुपये उभारू इच्छिते. यासाठी, कंपनी ३,५६० कोटी किमतीचे ५०८,५७१,४२९ शेअर बाजारात आणत आहे. तर, कंपनीचे विद्यमान गुंतवणूकदार ३,००० कोटी रुपयांचे शेअर ऑफर फॉर सेल द्वारे विकत आहेत.

(हेही वाचा – काश्मिरमध्ये अशांतता असेपर्यंत पाकशी चर्चा नाही – केंद्रीय मंत्री Amit Shah)

किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त २,७८२ शेअर्ससाठी बोली लावू शकतात

बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने या इश्यूची किंमत ६६ ते ७० रुपयांमध्ये निश्चित केली आहे. किरकोळ गुंतवणूकदार किमान एका लॉटसाठी म्हणजे २१४ शेअर्ससाठी बोली लावू शकतात. तुम्ही आयपीओच्या कमाल किमतीवर १ लॉटसाठी अर्ज केल्यास, तुम्हाला १४,९८० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

तर, किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त १३ लॉटसाठी म्हणजेच २,७८२ शेअर्ससाठी अर्ज करू शकतात. यासाठी गुंतवणूकदारांना वरच्या किंमतीच्या बँडनुसार १,९४,७४० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. IPO उघडण्याआधी, कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये ६६.४३% म्हणजेच ४६ रुपये प्रति शेअरच्या प्रीमियमवर पोहोचले आहेत. अशा परिस्थितीत, ७० रुपयांच्या वरच्या किंमतीच्या बँडनुसार, त्याची सूची ११६ रुपयांच्या आसपास असू शकते. हा फक्त अंदाज आहे.

(हेही वाचा – भविष्यात मुंबईसह किनारी भागांना धोका, संशोधनासाठी नासाचा खास Ice Node Robot प्रकल्प; जाणून घ्या)

बजाज हाऊसिंग फायनान्स ही २००८ मध्ये स्थापन झालेली नॉन-डिपॉझिट घेणारी हाउसिंग फायनान्स कंपनी आहे. कंपनी २०१५ पासून नॅशनल हाऊसिंग बँक मध्ये नोंदणीकृत आहे आणि आर्थिक वर्ष २०१८ पासून तारण कर्ज देते. ही कंपनी बजाज समूहाचा एक भाग आहे, जी गृहकर्ज, मालमत्तेवर कर्ज, भाडेतत्त्वावरील सवलत आणि विकासक वित्तपुरवठा यासह तारण उत्पादनांची श्रेणी ऑफर करते. ३१ मार्च २०२४ पर्यंत, कंपनीचे ३,०८,६९३ सक्रिय ग्राहक होते, त्यापैकी ८१.७% गृहकर्ज ग्राहक होते. (Bajaj Housing Finance IPO)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.