शहरातील मोची गल्ली येथे ५ सप्टेंबर या दिवशी दुचाकी लावण्याच्या किरकोळ कारणावरून शकूर शेख नावाच्या व्यक्तीने Muslim एका हिंदु महिलेला अरेरावीची आणि जातीवाचक भाषा करत शिवीगाळ केली. सदर भांडणाच्या वेळी शकूर याचा मुलगा अजिज शेख महिलेचा व्हिडिओ बनवत होता, तेव्हा त्या महिलेने व्हिडिओ काढण्यास विरोध केला असता अजिज शेख म्हणाला की, ‘मी व्हिडिओ काढणार आणि व्हायरल करून तुझी बदनामी करणार.’ शकूर आणि अजीज यांनी महिलेला मारहाण केली. या वेळी अजिज याने महिलेचा विनयभंग केला.
(हेही वाचा – Ganesh Visarjan 2024 : श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याची योग्य पद्धत)
यावेळी शकूर शेख, तसेच त्याचा पुतण्या अकलाक शेख आणि अजिज शेख यांनी महिलेला धमकी दिली की, ‘तुम्हाला कसे बाहेर काढायचे हे आम्हाला चांगले ठाऊक आहे. तू उद्यापासून येथे कशी येते तेच पहातो ? तुझा पत्ता कट करतो.’ त्या खाली पडल्या असता त्यांची आई त्यांना उठवण्यासाठी मध्ये आल्यावर त्यांनाही या दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली, तसेच महिलेच्या मैत्रिणीलाही धमकावले. या प्रकरणी पीडितेच्या पतीने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
(हेही वाचा – Ganpati Visarjan 2024: पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सुसज्ज)
पोलिसांनी शकूर, अजित शेख आणि अकलाक शेख Muslim यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना कह्यात घेतले आहे. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शकूर याने मोची गल्ली या ठिकाणी त्याची जागा नसतांना रस्त्यावर अतिक्रमण करून दुकाने लावलेली आहेत. त्यातील काही दुकानदारांकडून तो भाडेही घेतो. धर्माधांची ही मुजोरी मोची गल्लीत वाढत चालली असून स्थानिक हिंदूंना त्या ठिकाणी स्वतःचे दुकान आणि जागा असूनही काही करता येत नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community