Kolkata Rape Case प्रकरणी ठोस कारवाई न केल्याने TMC च्या खासदाराचा राजीनामा

139

आरजी कार मेडिकल महाविद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये घडलेल्या बलात्कार आणि खुनाच्या (Kolkata Rape Case) प्रकरणावर ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे TMCचे खासदार जवाहर सरकार यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना पत्र लिहून राजीनामा दिल्याची माहिती दिली आहे. तसेच दोषींना कठोर शिक्षा व्हावी, असेही पत्रात म्हटले आहे.

जवाहर सरकार यांनी ममता बॅनर्जी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, आरजी कार हॉस्पिटलमधील घडलेल्या घटनेमुळे (Kolkata Rape Case) मला खुप वेदना होत आहेत. त्या क्रूर घरनेबाबत मुख्यमंत्री तातडीने काही कठोर कारवाई करतील, अशी अपेक्षा होती. त्या आपल्या जुन्या शैलीत कारवाई करतील असे वाटले होते, पण त्यांनी कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. कारवाई करण्यासही उशीर केला. जवाहर सरकार पुढे म्हणतात, या प्रकरणात राज्य सरकार जी काही पावले उचलत आहे, ती पुरेशी नाहीत. त्या घटनेनंतर सरकारने भ्रष्ट डॉक्टरांवर आणि दोषींवर ताबडतोब कारवाई केली असती, तर राज्यातील परिस्थिती फार पूर्वीच सामान्य झाली असती. राज्यात लवकरच शांतता प्रस्थापित व्हावी आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा करतो.

(हेही वाचा Anant Ambani लालबागच्या राजाला दरवर्षी किती कोटींची देणगी देतात?)

पंचायत आणि नगरपालिकांमधील स्थानिक पातळीवरील पक्षाच्या नेत्यांनी प्रचंड संपत्ती जमा केली आहे, त्यामुळे बंगालच्या जनतेचे नुकसान झाले आहे. आंदोलनाचा मुख्य प्रवाह अराजकीय आहे, असे माझे मत आहे आणि त्याला राजकीय म्हणत संघर्ष निर्माण करणे योग्य नाही, असेही खासदार जवाहर सरकार म्हणाले. (Kolkata Rape Case)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.