आता Bangladesh मध्ये राष्ट्रगीत बदलण्याची मागणी; म्हणे, भारताने १९७१ मध्ये हे गीत आमच्यावर लादले

अशी अनेक गाणी आहेत जी राष्ट्रगीत म्हणून काम करू शकतात. नवीन राष्ट्रगीत निवडण्यासाठी सरकारने नवीन आयोग स्थापन करावा, असे जनरल अमन आझमी म्हणाले.

108
प्रतिकात्मक छायाचित्र

बांगलादेशात (Bangladesh) काही महिन्यांपूर्वी अराजक माजले, त्यात शेख हसीना यांना देश सोडून पळून जावई लागले. त्यानंतर त्या ठिकाणी महमंद युनूस यांच्या अंतरिम सरकार आले. मात्र हे सरकार हे अराजक माजविणाऱ्या दहशतवादी संघटनांचे समर्थक आहे. ज्यांचा पाकिस्तानशी आणि तेथील दहशतवादी संघटनांशी संबंध आहे. आत या संघटनांनी देशाच्या राष्ट्रगीतावरुन नवा वाद सुरू केला आहे. आता बांगलादेशात ‘आमार सोनार बांगला’ या राष्ट्रगीतावरून गदारोळ सुरू आहे. जमात-ए-इस्लामीचे माजी अमीर गुलाम आझम यांचे पुत्र अब्दुल्लाहिल अमान आझमी यांनी बांगलादेशचे (Bangladesh) राष्ट्रगीत आणि संविधानात बदल करण्याची मागणी केली आहे.

(हेही वाचा काश्मिरमध्ये अशांतता असेपर्यंत पाकशी चर्चा नाही – केंद्रीय मंत्री Amit Shah)

नवीन राष्ट्रगीत निवडण्यासाठी आयोग स्थापण्याची मागणी 

जनरल अमन आझमी म्हणाले, “मी राष्ट्रगीताचा मुद्दा या सरकारवर सोडतो. आपले सध्याचे राष्ट्रगीत हे आपल्या स्वतंत्र बांगलादेशच्या (Bangladesh) अस्तित्वाच्या विरुद्ध आहे. हे बंगालच्या फाळणीची आणि दोन बंगालच्या विलीनीकरणाची वेळ दर्शवते. दोन बंगालांना एकत्र करण्यासाठी तयार केलेले राष्ट्रगीत स्वतंत्र बांगलादेशचे राष्ट्रगीत कसे असू शकते?’, असा सवालही केला आहे. आझमी पुढे म्हणाले की, हे राष्ट्रगीत भारताने १९७१ मध्ये आपल्यावर लादले होते. अशी अनेक गाणी आहेत जी राष्ट्रगीत म्हणून काम करू शकतात. नवीन राष्ट्रगीत निवडण्यासाठी सरकारने नवीन आयोग स्थापन करावा. बांगलादेशचे (Bangladesh) राष्ट्रगीत प्रसिद्ध बंगाली संगीतकार रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले होते. बांगलादेशच्या अंतरिम सरकारमधील धार्मिक बाबींचे सल्लागार अबुल फैज मुहम्मद खालिद हुसेन यांनी शनिवारी सांगितले की, देशाचे राष्ट्रगीत बदलण्याची कोणतीही योजना नाही. पद्मा नदीच्या उत्तरेकडील राजशाही येथील इस्लामिक फाऊंडेशनला भेट दिल्यानंतर स्थानिक प्रसारमाध्यमांनी हुसैन यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, अंतरिम सरकार वाद निर्माण करण्यासाठी काहीही करणार नाही, आम्हाला सर्वांच्या सहकार्याने एक सुंदर बांगलादेश तयार करायचा आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.