गुंतवणुकीच्या आमिषाने १२१ जणांची नऊ कोटी रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी भालचंद्र महादेव अष्टेकर याच्याविरुद्ध फसवणूकीसह (Fraud) महाराष्ट्र ठेवीदारांचे वित्तीय संरक्षण ३ आणि ४ कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विजयकुमार मुरलीधर घाटे (५४) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
(हेही वाचा – Kolkata Rape Case प्रकरणी ठोस कारवाई न केल्याने TMC च्या खासदाराचा राजीनामा)
आरोपी अष्टेकर याने साई इंडस मार्केटिंग आणि मल्टी सर्व्हिसेस नावाने व्यवसाय सुरू केला होता. गुंतवणूकीवर ४ ते १५ टक्के व्याज देण्याचे आमिष त्याने घाटे यांना दाखविले होते. घाटे यांनी अष्टेकरला दहा लाख रुपये गुंतवणुकीसाठी दिले. घाटे यांच्यासह अनेकांनी अष्टेकर याच्या व्यवसायात पैसे गुंतविले होते. सुरुवातीला त्याने परतावा दिला. त्यानंतर त्याने परतावा दिला नाही. त्यामुळे तक्रारदारांनी त्याच्याकडे पाठपुरावा केला. (Fraud)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community