Mumbai devi temple : मुंबईची आई मुंबादेवी मंदिराची ही कथा तुम्ही ऐकली आहे का?

156
Mumbai devi temple : मुंबईची आई मुंबादेवी मंदिराची ही कथा तुम्ही ऐकली आहे का?

मुंबादेवी (Mumbai devi temple) ही मुंबईच्या सात बेटांवर राहणाऱ्या इथल्या मूलनिवासी कोळी बांधवांची रक्षणकर्ती देवी म्हणून ओळखली जाते. मुंबादेवीचं मंदिर हे मुंबईतल्या भुलेश्वर नावाच्या परिसरात स्टील आणि कपडा मार्केटच्या मधोमध स्थित आहे.

या मंदिरात मुंबादेवीची मूर्ती एका पाषाणात कोरलेली आहे. “महाअंबादेवी” नावाचा अपभ्रंश होऊन “मुंबादेवी” असं नाव पडलं आहे. हे मंदिर मुंबईतलं तीर्थक्षेत्र आहे. दररोज शेकडोंच्या संख्येने लोक या मंदिराला भेट देतात. तसंच हे मुंबादेवी मंदिर मुंबईतल्या पर्यटनस्थळांपैकी एक आहे.

(हेही वाचा – लालबागचा राजा काय महापौर बंगला वाटला का?; Sanjay Shirsat यांचा संजय राऊतांवर पलटवार)

मुंबादेवी मंदिराचा इतिहास

भुलेश्वर येथे असलेलं मुंबादेवी मंदिर (Mumbai devi temple) हे साठ वर्षांपूर्वी बांधलं गेलेलं आहे. त्याआधी मुंबादेवीचं पहिलं मंदिर हे बोरी बंदर येथे होतं. पण १७३९ ते १७७० च्या दरम्यान ते मंदिर नष्ट झालं. पूर्वी मुंबादेवीचं मूळ मंदिर कोळी बांधवांनी बांधलं होतं. पण परकीयांनी आक्रमण करून ते पाडलं.

भुलेश्वर येथे असलेल्या मुंबदेवीची प्रतिमा दगडात कोरलेली आहे. देवीला चांदीचा मुकुट, नाकातली नथ आणि सोन्याचा हार घातलेला आहे. मुंबादेवीच्या उजव्या बाजूला मोरावर बसलेल्या अन्नपूर्णा देवीची दगडी मूर्ती आहे. देवीच्या समोर तिचं वाहन असलेल्या वाघाची मूर्तीही आहे.

मुंबई शहराचं नाव मुंबादेवीच्या नावावरूनच ठेवण्यात आलं आहे. हे मंदिर फार मोठं नाही पण मुंबईची संरक्षक देवी म्हणून मुंबादेवीचा मोठा मान आहे.

(हेही वाचा – ‘कुतीया’, ‘शिर्क’, ‘काफिर’; Sara Ali Khanने इंस्टाग्रामवर गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्यावर मुसलमानांकडून तिला होत आहे शिवीगाळ )

महाअंबा देवीच्या मुंबादेवी रूपाची दंतकथा

देवी पार्वती मातेला महाकालीचं रूप धारण करण्यासाठी पराकोटीची एकाग्रता आणि चिकाटीची गरज होती. म्हणून महादेवांनी पार्वती मातेला कोळ्यांच्या घरी जन्म घ्यायला सांगितलं. कारण मासे पकडण्यासाठी अशाच एकाग्रता आणि चिकाटीची आवश्यकता असते. ती एकाग्रता आणि चिकाटी कोळी लोकांकडे असते. महादेवांनी सांगितल्याप्रमाणे पार्वती मातेने एका गावात म्हणजे सध्याच्या मुंबई शहरात कोळी दाम्पत्याकडे जन्म घेतला.

कोळीण म्हणून अवतार घेतलेली पार्वती माता मुंबा या नावाने ओळखली जायला लागली. मुंबाने लहानपणापासूनच मासेमारी करण्यासाठी लागणारी एकाग्रता आणि चिकाटी अंगीकारायला सुरुवात केली. ज्यावेळी ती त्यात सफल झाली तेव्हा पार्वती मातेला स्वगृही नेण्यासाठी महादेवांनी कोळ्याचं रूप घेऊन त्यांच्याशी विवाह केला.

तिथल्या स्थानिक कोळ्यांना पार्वती माता आणि महादेवांच्या खऱ्या रुपबद्दल समजलं तेव्हा त्यांनी पार्वती मातेला तिथेच राहण्याची विनंती केली. म्हणून मुंबाचं रूप घेतलेल्या पार्वती मातेने त्या गावातल्या सर्व कोळी बांधवांच्या संरक्षण करण्याचं मान्य केलं. ते सर्व कोळी बांधव तिला मुंबाआई असं म्हणायला लागले. मुंबाआईच्या नावावरूनच पुढे या शहराला मुंबई असं नाव पडलं. (Mumbai devi temple)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.