Madhya Pradesh मधील रतलाममध्ये गणेश मिरवणुकीवर दगडफेक; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

88
Madhya Pradesh मधील रतलाममध्ये गणेश मिरवणुकीवर दगडफेक; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
Madhya Pradesh मधील रतलाममध्ये गणेश मिरवणुकीवर दगडफेक; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) रतलाममध्ये (Ratlam) गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर काही अज्ञातांनी दगडफेक केल्याने तणाव निर्माण झाला आहे. या दगडफेकीत काही लोक जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल असून शहरातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

येथील मोचीपुरा भागात श्री गणेशमूर्तीच्‍या मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक करण्‍यात आली. यानंतर संतप्‍त हिंदूंनी पोलीस ठाण्‍याला घेराव घालत रस्‍ताबंद आंदोलन केले. त्‍यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्‍याची मागणी केली. तसेच जमावाकडून दगडफेक करणार्‍यांच्‍या भागात जाऊन वाहनांची तोडफोड करण्‍यात आली. त्‍यांना रोखण्‍यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्‍या नळकांड्या फोडल्‍या आणि परिस्‍थिती नियंत्रणात आणली.

(हेही वाचा – Malvan Shivaji Maharaj Statue : पुतळ्यांची उंची किती असावी ?; राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर होणार)

काय आहे प्रकरण ?

अंकला परिसरातील मोचीपुरा भागातून श्री गणेशमूर्तीची मिरवणूक निघाली होती. ट्रॅक्‍टर ट्रॉलीमधून श्री गणेशमूर्ती नेली जात होती. रात्री साडेनऊच्‍या सुमारास त्‍यावर दगडफेक करण्‍यात आली. या दगडफेकीत काही मुले जखमी झाल्‍याचे सांगण्‍यात येत आहे. श्री गणेशमूर्ती प्रतिष्‍ठापनास्‍थळी नेल्‍यानंतर संतप्‍त तरुणांचा जमाव स्‍टेशन रोड पोलीस ठाण्‍यात पोचला. तेथे घोषणाबाजी करत दोषींवर तात्‍काळ कडक कारवाई करण्‍यात यावी, अशी मागणी केली. पोलीस ठाण्‍यासमोर रस्‍ता बंद आंदोलन करण्‍यात आले.

यानंतर येथे हिंदू जागरण मंचचे नेते राजेश कटारिया, भाजप नेते निर्मल कटारिया यांच्‍यासह अनेक नेते घटनास्‍थळी पोचले. पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्‍थळी पोचून आंदोलकांशी बोलून त्‍यांना शांत करण्‍याचा प्रयत्न केला. यासंदर्भात पोलीस अधिक्षक म्हणाले, रतलामध्ये सध्या परिस्थिती नियंत्रणात असून येथे तणावपूर्ण शांतता आहे. या दगडफेकीच्या घटनेत काही लोक जखमी झाले आहेत. त्यांना उपाचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दगडफेकीमुळे गणपतीच्या मूर्तीचे कोणतेही नुकसान झालेले नाही. सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैन्यात केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.