तुम्ही जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाचे सरकार स्थापन करण्यात पुढाकार घ्या, आम्ही या ठिकाणी अभूतपूर्व असा विकास करून दाखवू. इथे होणारा विकास पाहून बाजूच्या पाकव्याप्त काश्मीरमधील लोक म्हणतील की, आम्हाला पाकिस्तानबरोबर राहायचे नाही, आम्हीही भारतात सामील होऊ. आम्ही तुम्हाला आमचे समजतो, पण पाकिस्तान तुम्हाला विदेशी नागरिक समजतो, असे आवाहन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी केले.
(हेही वाचा – Malvan Shivaji Maharaj Statue : पुतळ्यांची उंची किती असावी ?; राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर होणार)
अनेक वर्षांनंतर होणार निवडणूक
जम्मू आणि काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) अनेक वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी जाहीर सभा चालू आहेत. या सभेत राजनाथ यांनी हे आवाहन केले. त्यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहणाऱ्या नागरिकांना भारतात सामील होण्याचे आवाहन केले. त्यांनी पाकिस्तानच्या अतिरिक्त महाअधिवक्ताने दाखल केलेल्या एका प्रतिज्ञापत्राचा हवाला दिला. ज्यामध्ये पाकव्याप्त काश्मीर हा विदेशी भाग असल्याचे नमूद केले आहे.
पंबन विधानसभेतील भाजपाचे उमेदवार राकेश सिंह ठाकूर यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी राजनाथ म्हणाले की, २०१९ साली अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने आमूलाग्र बदल झाले आहेत. जम्मू-काश्मीर खोऱ्यातील मुलांच्या हातात आता पिस्तूल आणि बंदूकाऐवजी लॅपटॉप आणि संगणक आला आहे. यामुळे आता श्रीनगरच्या जनतेवर कुणीही गोळी झाडण्याची हिंमत करत नाही.
पंबन विधानसभेत भाजपाचे (BJP) उमेदवार ठाकूर यांचा सामना नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार अर्जून सिंह राजू यांच्याशी होणार आहे. तर अपक्ष उमेदवार सुरज सिंह परिहार हेदेखील दोघांना टक्कर देणार आहेत. (Rajnath Singh)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community