Badlapur Crime : बदलापुरात २२ वर्षीय तरुणीवर लैगिंक अत्याचार, एका तरुणीसह तिघांना अटक

226
Badlapur Crime : बदलापुरात २२ वर्षीय तरुणीवर लैगिंक अत्याचार, एका तरुणीसह तिघांना अटक
Badlapur Crime : बदलापुरात २२ वर्षीय तरुणीवर लैगिंक अत्याचार, एका तरुणीसह तिघांना अटक

वाढदिवसाच्या पार्टीत एका २२ वर्षीय महिलेला अंमली पदार्थ पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बदलापूर पोलिसांनी शुक्रवारी एका महिलेसह तिघांना अटक केली. भूमिका मेश्राम (२०), शिवम राजे (२३) आणि संतोष रुपवते (४०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बुधवारी रात्री शिरगाव (Shirgaon) परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. बदलापूरची रहिवासी असलेली पीडित तरुणी, भूमिका आणि शिवम या दोन आरोपींना ओळखत होती – हे सर्व बदलापूरचे रहिवासी होते. भूमिकाने पीडितेला तिच्या मित्राच्या घरी वाढदिवसाच्या पार्टीला बोलावले होते. पीडितेने पार्टीत सहभागी होण्याचे मान्य केले आणि भूमिकासोबत शिरगाव येथील फ्लॅटवर गेली. फ्लॅटमध्ये भूमिकाचा सातारा येथील नातेवाईक संतोषही त्यांच्यासोबत आला होता. त्यांनी कथितरित्या पीडितेच्या थंडपेय मध्ये गुंगीच औषध टाकून आणि दोन पुरुष आरोपींपैकी एकाने तिच्यावर बलात्कार केला, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. (Badlapur Crime)

(हेही वाचा – BMC School : सुरक्षेसोबतच पालिका शाळांमधील गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह)

पीडितेच्या आई-वडिलांनी तिला फोन केला असता भूमिकाने त्यांना सांगितले की, ती दारू पिऊन झोपी गेली होती. तिने आई-वडिलांना घरी नेण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी पीडितेच्या कुटुंबीयांनी तिला लवकर घरी आणले. काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आल्याने पीडितेला डॉक्टरांकडे आणले असता तिच्यावर लैगिंग अत्याचार झाल्याचे लक्षात आले, कुटुंबीयांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आला पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (Badlapur Crime)

बदलापूर पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही तिच्या तक्रारीच्या आधारे बीएनएस कायद्यांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून तीन आरोपींना अटक केली आहे. आम्ही अजूनही प्रत्येक आरोपीची भूमिका निश्चित करत आहोत आणि तपास सुरू ठेवत आहोत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.