राज्यात गेल्या वर्षीपासून आलेल्या कोरोना संकटामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. मात्र आता राज्य सरकार कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहे. दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचा पहिली ते बारावीपर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनातर्फे करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली असून, लवकरच याचा निर्णय होणार आहे.
पहिली ते बारावीच्या शिक्षणाचा खर्च करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आग्रही आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही त्यांनी सांगितले.
(हेही वाचा : अखेर ‘आशा’ सेविकांचा संप मागे! आरोग्यमंत्र्यांनी ‘या’ मागण्या केल्या मान्य!)
आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता
दरम्यान आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. आज होणाऱ्या कॅबिनेटमध्ये याबाबतचा निर्णय होऊन जीआर निघण्याची दाट शक्यता असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. ज्या मुलांनी दोन्ही पालकांना गमवाले त्यांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च शासनाकडून करण्याची तयारी शिक्षण विभागाने केल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता पाहता सरकारकडून योग्य त्या उपाययोजना आखण्यात येत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे येत्या काळात शाळा सुरू होणार नाहीत, असे देखील त्या म्हणाल्या.
Join Our WhatsApp Community